Share

MNS : शिंदेंपाठोपाठ मनसेनेही ठोकले शड्डू! शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला विरोध करत म्हणाले…

Raj Thackeray

MNS : काल २३ तारखेला दसरा मेळाव्यासंबंधी कोर्टाने निकाल दिला. शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी कोर्टाने परवानगी दिली आहे. त्यामुळे काल शिवसनिकांमध्ये चांगलाच उत्साह संचारलेला पाहायला मिळाला. अनेक दिवसांपासून रखडलेला हा निर्णय अखेर काल मार्गी लागला.

शिवसेनेला दसरा मेळाव्याची परवानगी मिळाल्यामुळे भाजप आणि शिंदे गटाकडून अनेक टीकाही करण्यात येत आहे. तसेच आम्हाला परवानगी मिळणारच होती असे शिवसैनिकांकडून सांगण्यात येत आहे. या सगळ्या प्रकरणावर आता मनसेनेही टीकास्त्र सोडले आहे.

मनसेने दसरा मेळाव्यावरून उद्धव ठाकरेंना थेट आव्हानच दिले आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी हे आव्हान दिले आहे. यावेळी ते म्हणाले की, “मैदानासाठी परवानगी मिळाली त्याबद्दल अभिनंदन. पण मैदानामध्ये तुम्ही कोणाचा वारसा सांगणार आहात? कोणाचे विचार मांडणार आहात? मैदानात जाऊन जर शिव्याच घालायच्या असतील आणि नुसते टोमणेच मारायचे असतील तर दसरा मेळाव्याला काय अर्थ आहे?”

तुम्ही दसरा मेळव्यात बाळासाहेबांच्या हिंदुत्वाबद्दल बोलणार आहात का? तसेच महाराष्ट्रातील मराठी माणसाबद्दल बोलणार आहात का?, असा सवाल संदीप सेशपांडे यांनी उद्धव ठाकरेंना केला आहे. तसेच पुढे ते म्हणाले की, नुसते टोमणे मारण्यापेक्षा तुमची अनधिकृत मशिदींवरच्या भोंग्यांबद्दल काय भूमिका आहे. महाराष्ट्रातील मराठी माणूस मुंबई सोडून बाहेर का चालला आहे? या सगळ्या विषयांवर जर तुम्ही बोललात तर त्या मैदान मिळण्याला खरा अर्थ राहील, असेही संदीप देशपांडे म्हणाले आहेत.

या सगळ्या विषयांवर बोलण्याचे आव्हान त्यांनी उद्धव ठाकरेंना दिले आहे. तसेच बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा जर कोणाकडे असेल तर तो राज ठाकरे साहेबांकडे आहे, असेही ते म्हणाले आहेत. ते माध्यमांशी बोलत होते. यावर उद्धव ठाकरे काय प्रतिक्रिया देतात, तसेच दसरा मेळाव्यात मनसेचे हे आव्हान उद्धव ठाकरे पूर्ण करणार का?, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कोर्टाने शिवसेनेला दसरा मेळाव्याची परवानगी दिल्यानंतर शिवसेनेच्या अनेक नेत्यांकडून प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या आहेत. मात्र, कोर्टाच्या या निर्णयावर शिंदे गट नाराज झाल्याचे दिसते. दरम्यान, यावर्षीच्या दसरा मेळाव्यात शिवाजी पार्कवर शिवसेनेचा तर बीकेसी येथील मैदानात शिंदे गटाचा आवाज घुमणार असल्याचे बोलले जात आहे.

महत्वाच्या बातम्या
uddhav thackeray : दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार; उद्धव ठाकरेंनी थोपटले दंड अन् मुख्यमंत्री शिंदेंना फुटला घाम
Uddhav Thackeray : दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार, परवानगी न मिळाल्यास बाळासाहेबांची ‘ही’ आयडीया वापरणार उद्धव ठाकरे
politics : आमचा दसरा मेळावा बघायला बाळासाहेबांचा आत्मा येईल; शिंदे गटातील नेत्याचे खळबळजनक वक्तव्य
Shivsena : परवानगी मिळो ना मिळो दसरा मेळावा शिवतीर्थवरच होणार’, शिवसैनिक आक्रमक

 

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now