गेल्या काही दिवसांपासून भाजप खासदार ब्रिजभूषण सिंग आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यामध्ये वाद सुरु आहे. भाजप खासदार ब्रिजभूषण सिंग यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात अयोध्येत शक्तिप्रदर्शन करण्याची घोषणा केली होती. या शक्ती प्रदर्शनासाठी अयोध्येत पाच लक्ष लोक जमतील, असा दावा भाजप(BJP) खासदार ब्रिजभूषण सिंग यांनी केला होता. (mns criticize bjp mp brijbhushan singh for ayoshya event )
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा रद्द झाल्यानंतर रविवारी भाजप खासदार ब्रिजभूषण सिंग यांनी अयोध्येत शक्तिप्रदर्शन केले. यावेळी केवळ पाच हजार लोक जमले होते, अशी माहिती मिळत आहे. अयोध्येत शरयू नदीकाठाला असलेल्या राम कथा पार्कमध्ये या शक्तिप्रदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी भाजप खासदार ब्रिजभूषण सिंग यांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी केली होती. या कार्यक्रमासाठी अयोध्येतील साधू संतांना देखील कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले होते. या कार्यक्रमामधील अनेक खुर्च्या रिकाम्या होत्या. साधारणतः पाच हजार लोकांची या कार्यक्रमाला उपस्थिती असल्याची माहिती मिळत आहे.
राज ठाकरेंच्या विरोधात केलेले शक्ती प्रदर्शन अपयशी ठरल्यानंतर मनसेने भाजप खासदार ब्रिजभूषण सिंग यांच्यावर निशाणा साधला आहे. “भाजप खासदार ब्रिजभूषण सिंग यांचा अयोध्येत फुसका बार, लोक जमली कशीबशी पाच हजार”, असा खोचक टोला मनसेने लगावला आहे. यावेळी मनसेने भाजप खासदार ब्रिजभूषण सिंग यांच्यावर टीका केली आहे.
भाजप खासदार ब्रिजभूषण सिंग यांच्या आवाहनाला लोकांनी केराची टोपली दाखवली आहे. शक्ती प्रदर्शनासाठी पाच लाख लोक जमतील असे ब्रिजभूषण सिंग यांनी सांगितले होते. या शक्ती प्रदर्शनासाठी ब्रिजभूषण सिंग यांनी महिनाभर मेळावे घेतले. गावोगावी जाऊन शेकडो बैठका घेतल्या. पण अयोध्येत झालेल्या या शक्ती प्रदर्शनात कसेबसे पाच हजार लोक जमले होते”, असा टोला मनसेने लगावला आहे.
यावेळी शक्ती प्रदर्शनाच्या कार्यक्रमामध्ये भाजप खासदार ब्रिजभूषण सिंग यांनी ‘जय श्री राम’ अशा घोषणा देखील दिल्या. तसेच शक्ती प्रदर्शनाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या लोकांकडून राज ठाकरेंच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. या शक्ती प्रदर्शनासाठी भाजप खासदार ब्रिजभूषण सिंग यांनी जोरदार तयारी केली होती.
ब्रिजभूषण सिंग यांनी राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याच्या विरोधात वातावरण तयार करण्यासाठी उत्तर प्रदेशमध्ये सभा घेतल्या होत्या. तसेच या शक्ती प्रदर्शनासाठी जनजागृती केली होती. भाजप खासदार ब्रिजभूषण सिंग यांनी बिहार मधील काही भागात सभा घेतल्या होत्या. तसेच रॅली देखील घेतली होती.
महत्वाच्या बातम्या :-
मला मुद्दाम सचिनला जखमी करायचे होते कारण…, शोएब अख्तरने सांगितला ‘तो’ धक्कादायक किस्सा
लिलावात अनसोल्ड राहिला होता ‘हा’ खेळाडू, हार्दिक पांड्याने दाखवला विश्वास अन् गाजवले मैदान
..तर दादा कोंडके, निळु फुले, लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ नायक होऊ शकले नसते- अशोक सराफ