“मिनी लॉकडाऊनच्या नावाखाली जनतेची फसवणूक करून सरकारने लॉकडाऊन लावला”

राज्यासह देशात कोरोनाचा पुन्हा उद्रेक पाहायला भेटत आहे. कोरोनाचा वाढता आकडा लक्षात घेता तज्ञांनीही चिंता व्यक्त केली आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने नवीन नियमावली जाहीर केली आहे आणि राज्यात विकेंड लॉकडाऊन लावण्यात आला आहे आणि काही निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यामुळे सोमवारी रात्रीपासून कडक निर्बंध लावण्यात आले आहेत.

रात्री ८ ते सकाळी ७ पर्यंत संचारबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र सरकारच्या या निर्णयाचा विरोध केला जात आहे. सामान्य जनतेपासून ते व्यापाऱ्यांपर्यंत मोठ्या प्रमाणात सरकारचा विरोध केला जात आहे. त्यामुळे या नियमांमध्ये बदल करण्यात यावेत अशी मागणी देखील राज ठाकरे यांनी केली होती.

तर आता मनसे नेते संदीप देशपांडे यांनीही सरकारवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले आहेत की लॉकडाऊनच्या नावाखाली जनतेवर लादलेल्या लॉकडाऊनचा कडाडून विरोध. आम्ही आधीच सांगितलं होतं की अर्थचक्र आणि निर्बंध याचा समतोल राखला गेला नाही तर सर्वसामान्यांमध्ये भडका उडेल.

याचा प्रत्यय राज्यभरात पाहायला मिळाला. सरकारने लॉकडाऊनच्या नावाखाली जनतेची फसवणूक केली आहे आणि प्रत्यक्षात लॉकडाऊन लावला गेला आहे असा निशाणा त्यांनी सरकारवर साधला आहे. सरकारने छोट्या उत्पादकांना उत्पादन करण्याची परवानगी दिली पण ते माल विकू शकणार नाहीत कारण दुकाने बंद आहेत.

दंडुकेशाहीच्या जोरावर लोकशाही जास्त दिवस टीकू देणार नाही त्यामुळे सरकारने याचा विचार करावा. अन्यथा काही दिवसांत जनतेचा मोठ्या प्रमाणावर उद्रेक पाहायला मिळेल. सरकारने पुढील काही दिवसांत निर्णय घ्यावा. मनसेदेखील आपली पुढील भुमिका जाहीर करेल, अशी टीका त्यांनी ठाकरे सरकारवर केली आहे आणि मिनी लॉकडाऊनचा विरोध केला आहे.

महत्वाच्या बातम्या
परमीरसिंगच सचिन वाझेचे गॉडफादर; परमबीरसिंगांचे सगळे काळे कारनामे आले बाहेर
धक्कादायक! पुण्यात कोरोना आवाक्याबाहेर, पुणे महानगरपालिकेची लष्कराकडे मदतीची हाक
नेत्यांच्या सभा होतात पण उद्योगांना बंदी; अनिल अंबानीच्या मुलाची ठाकरे सरकारवर बोचरी टीका
पलंगावर झोपल्यामूळे मिथून चक्रवर्तीची झाली होती धुलाई; वाचा पुर्ण किस्सा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.