लोकं मरायला लागलेत, अन् एसीमध्ये बसून नाटकं करता का? पुण्यात मनसे नगरसेवक अधिकाऱ्यांवर भडकला

पुणे |  कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे.  पुण्यात कोरोनाने भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. लस, ऑक्सिजन, व्हेंटिलेटरचा मोठा तुटवडा जाणवू लागला आहे. रुग्णांच्या उपचारासाठी नातेवाईक धडपड करताना दिसून येत आहेत.

पुण्यातील मनसे नगरसेवक आणि पुणे शहराध्यक्ष वसंत मोरे  रुग्णांच्या मदतीला धावून आले होते. मोरे यांनी काही दिवसांपुर्वी साई स्नेह हॉस्पीटलच्या मदतीने कोरोना रुग्णांसाठी ४० बेड ऑक्सिजन आणि ४० बेड होम आयसोलेशन सेंटर फक्त ५ दिवसांत उभं केले होते.

रेमडेसिव्हीर, ऑक्सिजन यावरून वसंत मोरे यांनी थेट पुणे महानगरपालिकेत जाऊन जोरदार राडा घातला आहे. यावेळी मोरे यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच झापले आहे. पुण्यातील पहिला नगरसेवक गोरगरीबांना वेळेवर उपचार मिळावा यासाठी धडपडत आहे आणि हे अधिकारी गुन्हे दाखल करण्याची भाषा करतात. असं मोरे यांनी म्हटलं आहे.

मोरे यांनी सुरू केलेल्या कोविड सेंटरला रेमडेसिवीर, ऑक्सिजन यांचा पुरवठा महानगरपालिकेने बंद केल्याने त्यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना चांगलेच सुनावले आहे. पुण्यातील मोठ्या हॉस्पीटल्सना रेमडेसिव्हीर मिळतंय. तर माझ्या कोविड सेंटरला का मिळत नाही असा सवाल नगरेवक वसंत मोरे यांनी केला आहे.

आम्ही आमच्या घरच्यासांठी मागतोय काय? चर्चा करण्यासाठी आल्यावर अधिकारी खुर्चीवरून उठून जाताच. एक नगरसेवक काम करतोय त्याला सपोर्ट करायचं सोडून तुम्ही त्याचे पाय खेचता. लोकं बाहेर मरायला लागलेत आणि तुम्ही लोकं एसीमध्ये बसून असता. असं म्हणत मोरे चांगलेच संतापले  होते.

कोण आहेत वसंत मोरे

वसंत मोरे हे पुण्यातील कात्रज परिसरातील नगरसेवक आहेत. मनसेचे आक्रमक नेते म्हणून त्यांना ओळखले जाते. राज ठाकरेंसोबत त्यांचे जवळचे संबंध आहेत. काही दिवसांपुर्वी त्यांच्यावर मनसे पुणे शहर अध्यक्षपदाची जबाबबदारी सोपवण्यात आली आहे.

कोरोना काळात त्यांनी अनेक गोरगरीबांची मदत केली होती. पुण्यातील मनसेच्या आंदोलनात ते नेहमी सहभागी असतात. गेल्या सप्टेंबर महिन्यामध्ये कोरोना रुग्णांचे पार्थिव नेण्यासाठी रुग्णवाहिका मिळत नसल्याने त्यांनी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याची गाडी फोडली होती.
महत्वाच्या बातम्या-
भारतातील कोरोना परीस्थीतीवर बोलताना अक्षरश ढसाढसा रडली शिल्पा शेट्टी; म्हणाली…
भारत माझ दुसरं घर, तिथल्या लोकांना तडपताना नाही पाहू शकत; ब्रेट लीने केली ४१ लाखांची मदत
‘जेवण नंतर करू, आधी देशासाठी ऑक्सिजन करायचाय’; खानेपिणे सोडून काम करताहेत कामगार
ठाण्यातील रुग्णालयात भीषण आग, चार रुग्णांचा मृत्यु; मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत जाहीर

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.