वाढीव वीजबिलावरून मनसेने महावितरणचे कार्यालय फोडले

पुणे | महावितरणच्या वाढीव वीजबिलाने अनेक जण त्रासले आहेत. त्यामध्ये मोठमोठे सेलिब्रिटीसुद्धा आहेत. लॉकडाऊनच्या काळात वाढीव वीजबिलामुळे सामान्य नागरिक त्रासले आहेत. मात्र वीजबिल योग्यच असून कोणतेही अतिरिक्त वीजबिल जोडले गेले नसल्याची माहिती वितरणाकडून देण्यात येते.

मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपल्या पद्धतीने महावितरणाला दणका दिला आहे. राजगुरूनगर येथील चांदोली येथे मनसेच्या कार्यकर्त्यांनी वाढीव वीजबिलांवरून महावितरण कार्यकारी उपअभियंता यांचे कार्यालय फोडले. तरी काही दिवसांपूर्वी मनसेने महावितरणला नागरिकांच्या बिलासंबंधी समस्या दूर होत नसल्याने एक निवेदन दिले होते.

मात्र त्यावर कुठलीही कारवाई होत नसल्याने मनसेच्या तीन कार्यकर्त्यांनी आक्रमक होत प्रशासनाच्या विरोधात घोषणा देत चांडोली येथे महावितरण उपअभियंता मनिष कडू यांचे कार्यालय फोडले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वीजबिले प्रमाणापेक्षा जास्त आल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.

मनसेने ताकीद दिली होती की, समस्यांवर तोडगा काढा अन्यथा वीज वितरण कंपनी विरोधात तीव्र आंदोलन केले जाईल. मात्र यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही त्यामुळे महावितरणचे कार्यालय फोडण्यात आले.

महत्वाच्या बातम्या-

फुल्ल भरून धावणार ‘लालपरी’; मात्र एसटीत बसण्यासाठी ‘या’ गोष्टी बंधनकारक

‘खबरदार माझी तुलना रिया चक्रवर्ती सोबत केली तर…’

ड्रग्ज प्रकरणी नाव आल्यानंतर ‘या’ अभिनेत्रीने घेतली थेट हायकोर्टात धाव

एसटी वाहतूकीबाबत राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय

१९८३ बॅचने ५०० पेक्षा जास्त एन्काऊंटर करून मुंबईतल्या अंडरवर्ल्डचे कंबरडे मोडले होते

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.