‘जमल्यास उद्धवजींना हिंदुबाबत…’; बाळासाहेबांचा उल्लेख करत मुख्यमंत्र्यांविरोधात मनसेची बॅनरबाजी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या गुढीपाडवा मेळाव्यात अजानासाठी मशिदींवर लावण्यात येणाऱ्या भोंग्यावर आक्षेप घेतला होता. तुम्ही मशिदीवरील भोंगे नाही उतरवलेत तर आम्ही भोंगे लावून हनुमान चालिसा सुरु करु, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला होता. यावर भाजपव्यतिरिक्त(BJP) इतर पक्षांनी राज ठाकरे यांच्या विधानाचा विरोध करत टीका केली होती.(mns banner in prbhadevi about cm uddhav thakare)

तसेच राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्याबाबत घेतलेल्या भूमिकेवरून त्यांच्याच पक्षातील काही पदाधिकाऱ्यांनी नाराजी दर्शविली होती. यादरम्यान मुबंईत मनसे कार्यकर्त्यांनी लावलेल्या एका बॅनरची सध्या चर्चा होतं आहे. या बॅनरमध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख करण्यात आला असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्यात आली आहे.

हा बॅनर मुंबईतील प्रभादेवी परिसरात लावण्यात आला आहे. “माननीय बाळासाहेब, बघा आपले सुपुत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हिंदू असून हनुमान चालिसा म्हणायला बंदी घालत आहेत. हिंदूंनी लावलेले भोंगे काढत आहेत. आपला ठाकरी बाणा आणि वारसा खऱ्या अर्थाने फक्त राजसाहेब ठाकरेच चालवत आहेत. जमल्यास उद्धवजींना हिंदूंबाबत समृद्धी द्या…”, असा आशय बॅनरवर लिहण्यात आला आहे.

या बॅनरची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. प्रभादेवी परिसरात लावण्यात आलेल्या या बॅनरमुळे शिवसैनिक संतापले आहेत. शनिवारी झालेल्या गुढीपाडवा मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला होता. तसेच या मेळाव्यात राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर देखील टीका केली होती.

1999 ला जेव्हा राष्ट्रवादीचा जन्म झाला, त्यानंतर जातीपातीचं राजकारण वाढलं, असा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मेळाव्यात केला होता. राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिलं होतं. सर्व जातीच्या लोकांना एकत्र घेऊन पुढे नेण्याची भूमिका राष्ट्रवादीची आजही आणि उद्याही राहिल, असं शरद पवार म्हणाले होते.

“बरेच महिने राज ठाकरे कुठे भूमिगत झाले होते, याचा काही कुणाला अंदाज येत नव्हता. त्यांचं हेच वैशिष्ट आहे की, दोन-चार महिने कुठेही भूमिगत होतात आणि एखादं व्याख्यान देऊन पुन्हा पुढचे तीन-चार महिने काय करतात मला माहीत नाही”, असे देखील शरद पवार म्हणाले होते. राज ठाकरे यांच्या भूमिकेत सातत्य नसतं, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली होती.

महत्वाच्या बातम्या :-
सई ताम्हणकरला मिळाला तिचा लाइफ पार्टनर? स्वतःच फोटो शेअर करत म्हणाली, ‘माझ्यामुळे…’
“राज ठाकरे किती दिवस आमच्या पोरांची डोकी भडकवणार, म्हणजे तुमची मुलं स्टडीत आणि आमची मुलं कस्टडीत?”
9 एप्रिलला राज ठाकरे पुन्हा गरजणार, आरोप करणाऱ्यांना ठाकरी भाषेत मिळणार सडेतोड उत्तरं