रिक्षानंतर दुचाकी चालकांनाही मनसेचा दिलासा; फायनान्स कंपनीने कर्जाची रक्कम केली माफ

मुंबई । महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या दणक्यामुळे बजाज फायनान्सचे कर्ज घेतलेल्या १,१९,७४३ रिक्षा चालकांची सुमारे पन्नास कोटींची दंडात्मक रक्कम माफ केली. त्यानंचर आता दुचाकीस्वारांना देखील मनसेने दिलासा दिला आहे.

मनबा फायनान्स या दुचाकी खरेदी साठी कर्ज देणाऱ्या वित्तीय संस्थेने मनसेने केलेल्या आवाहानाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. मनबा फायनान्स ने सहा महिन्यांसाठी बाऊन्सिंग चार्जेस माफ केले आहेत.

याचा लाभ एकूण १२८४३ ग्राहकांना होणार आहे. या संदर्भातील पत्र मनबा फायनान्स च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या महाराष्ट्र गड या मुख्यालयात आणून दिले.

यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे अध्यक्ष संजय नाईक, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस कीर्तिकुमार शिंदे व सचिव सचिन मोरे ही उपस्थित होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.