शेतकऱ्यांचं वीज कनेक्शन तोडलं म्हणून आमदारांनी महावितरण अभियंत्यांना खुर्चीला बांधलं…

मुंबई : थकीत विज बिल वसुलीसाठी गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात महावितरण कंपनीकडून शेतीपंपाचे वीज कनेक्शन कट करण्याचा सपाटा सुरू आहे. अशातच जळगाव मधील चाळीसगाव तालुक्यातील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कट केल्याच्या कारणावरून आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह आंदोलकांनी जळगाव महावितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता फारूख शेख यांना त्यांच्या खुर्चीवर दोरीने बांधले.या प्रकरणी वीज कंपनीच्या अभियंत्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली.

शेतक-यांचा वीज पुरवठा खंडीत केल्याच्या कारणावरून शुक्रवारी दुपारी जळगाव येथील वीज कंपनीच्या कार्यालयात आमदार चव्हाण यांच्यासह शेतकरी आले. यावेळी आमदार चव्हाण यांनी अधीक्षक अभियंत्यांना वीज कनेक्शन कट केल्याबाबत जाब विचारला.

अधीक्षक अभियंत्यांनी आमदारांसह आंदोलकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान आमदारांनी शेख यांना शिवीगाळ करीत त्यांच्या अंगावर वीज बिल फेकले. त्यानंतर संतप्त आमदार व आंदोलकांनी शेख यांना त्यांच्याच खुर्चीला दोरीने बांधून ठेवले

दरम्यान, महावितरणच्या अधिकाऱ्यांनी काही शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कट केल्याच्या कारणावरून महावितरण कंपनीच्या अधीक्षक अभियंत्यांना दोरीने बांधल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

भाजप आमदाराला पोलिसांसमोरचं केली मारहाण, कपडे फाडत काळे फासले

“मोदीजी हे आतापर्यंत भारताला लाभलेले सर्वोत्तम जागतिक नेते – नरेंद्र मोदी”

महाराष्ट्रातील ‘या’ मोठ्या शहरात दहा दिवसांसाठी लाॅकडाऊन जाहीर

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.