राजीनामा देत आमदाराचे मोदींवर गंभीर आरोप; म्हणाले दिल्लीतील हिंसाचार हा तर मोदींचाच डाव

नवी दिल्ली | प्रजास्ताक दिनी शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन केले होते. गेल्या दोन महिन्यापांसून संयमाने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला मंगळवारी हिंसक वळण लागेले. यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. हिंसाचाराच्या घटनेमुळे आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. अशात दिल्लीतील या हिंसाचाराच्या मागे केंद्रातील मोदी सरकार असल्याचा आरोप करत आमदार अभय चौटाला यांनी राजीनामा दिला आहे.

यापुर्वी राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी या हिंसाचाराच्या पाठीमागे भारतीय जनता पार्टीचे सरकार असल्याचे म्हटले होते. आता इंडियन नॅशनल लोक दलाचे आमदार अभय चौटाला यांनी दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ हिंसाचारानंतर राजीनामा दिला आहे.

अभय चौटाला यांनी दिल्लीतील आंदोलनात शेतकरी नेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात असल्याचा विरोध केला आहे. त्यांनी आपला राजीनामा चंढीगड विधासभा अध्यक्षांकडे सोपवला आहे. यावेळी ते बोलताना म्हणाले, देशातील प्रत्येक शेतकरी पुत्राने राजकारणापलिकडे जाऊन शेतकऱ्यांची साथ दिली पाहीजे असं म्हटले आहे.

दिल्लीत झालेल्या हिंसक आंदोलनाचे पडसाद देशभर उमटले आहेत. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. परंतु दुसरीकडे या घटनेनंतर आंदोलनाची दिशा आता कशी असणार आहे असा सवाल उपस्थित होतो आहे.

महत्वाच्या बातम्या-
शेतकरी आंदोलनात फूट! ट्रॅक्टर रॅलीतील हिंसाचारानंतर दोन शेतकरी नेत्यांनी घेतली माघार
दिल्लीच्या घटनेमागे भाजपचाच हात; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याने केलेल्या आरोपाने उडाली खळबळ
बेरोजगारांसाठी खुशखबर! कॅगमध्ये ११ हजार जागांची मेगाभरती; १ लाखांपर्यंत पगार
तब्बूच्या साड्यांना इस्त्री करत होता बॉलीवूडचा ‘हा’ दिग्दर्शक; आज एका चित्रपटासाठी घेतो करोडो रुपये

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.