वडापाव विकता विकता हा माणूस कसा बनला आमदार; एकदा वाचाच…

 

निवडणूक लढण्यासाठी आमदार लाखो रुपयांचा खर्च करत असतात. अनेकदा प्रचार सभेसाठी, कार्यकर्ते गोळा करण्यासाठी नेते लाखो रुपये मोजतात. कारण नेत्यांची खाजगी संपत्तीच कोट्यवधींमध्ये असते, मात्र डहाणू विधानसभेतून निवडून आलेले मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार विनोद निकोले याला अपवाद आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ मध्ये ते डहाणू तालुक्यातुन आमदार म्हणून निवडुन आले होते. लहाणपणापासूनच संघर्ष करत असलेले निकोले यांचा आमदार झाल्यावर पण संघर्ष कायम आहे.

विनोद निकोले यांची ओळख विधानसभेतील सर्वात गरिब आमदार म्हणून आहे. निकोले यांचे मुळगाव डहाणू तालुक्यातील उर्से हे खेडेगाव आहे. गरिब कुटुंबात जन्माला आलेले निकोले यांच्याकडे आज आमदार असून पण स्वता: चे घर नाही. त्यांच्याकडे फक्त ५१ हजार ८२ रुपयांची रोकड आहे.

गरिब कुटुंबात जन्मलेल्या निकोले यांचे आई-वडिल मजुरी करायचे. त्यांच्या आई-वडिलांनी मजुरी करुनच विनोद यांना शिकवले. महाविद्यालयाचे शिक्षण घेताना सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम त्यांनी सुरुच ठेवले होते.

शिक्षणानंतर त्यांनी चरितार्थ चालवण्यासाठी डहाणूमध्येच टपरी टाकून चहा आणि वडापाव विकण्यास सुरुवात केली. निकोले यांना सामाजिक प्रश्नांची आधिपासुनच जाण होती. त्यांच्या टपरीवर चहासाठी माकपचे बुजूर्ग कॉम्रेड एल बी धनगर येत असायचे.

त्यांच्यात सतत होणाऱ्या संवादामुळे धनगर आणि निकोले चांगले मित्र झाले. २००३ साली धनगर यांनी निकोले यांना माकपचे सदस्य बनवून घेतले. २००६ साली निकोले माकपचे पुर्णवेळ कार्यकर्ते म्हणून काम करु लागले. त्यावेळी त्यांना ५०० रुपये महिना मिळत होता.

निकोले नेहमीच आदीवासींवरिल अन्याय आणि अत्याचाराविरोधात लढा दिला आहे. तसेच शेतकऱ्यांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी निकोले नेहमीच पुढे उभे राहिले आहे. त्यामुळेत निकोले २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार धनारे यांचा पराभव करुन आमदार झाले.

केवळ पैशांच्या जोरावर निवडणूक जिंकता येत नाही, त्यासाठी जनतेशी एक नातेही असावे लागते, हे विनोद निकोले यांनी दाखवून दिले आहे. तसेच विधानसभेतील सर्वात गरिब आमदार म्हणून राज्यातील नागरिकांचे प्रश्न विधानसभेत ताकदीने मांडू शकतो, असा विश्वास पण त्यांनी व्यक्त केलेला आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.