आमदार खासदारांना रस्त्यात अडवून जाब विचारा; उदयनराजेंचे मराठ्यांना आवाहन

खासदार उदयनराजे भोसले यांनी आज दिनांक ७ मे २०२१ ला मराठा आरक्षण रद्द केल्याबद्दल त्यांचे मत व्यक्त केले आहे. उदयनराजे यांनी म्हटले आहे की, “मराठा आरक्षणासंदर्भात लागलेला हा निकाल मराठा समाजाला अंधारात लोटणारा आहे.

मराठा समाजाने दारिद्र्याबाबतचे सगळे पुरावे दिले असताना देखील समाजाला आरक्षण मिळत नाहीत, या सर्वांचा जाब लोकांनी आमदार खासदारांना रस्त्यात अडवून विचारायला पाहिजे” असे उदयनराजे यांनी म्हटले आहे.

सातारा येथे प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी आपले मत व्यक्त केले आहे. राज्यामध्ये ज्या वेग वेगळ्या जाती आहेत त्या जातींना कोणताही त्रास होऊ न देता मराठा समाजाला आरक्षण द्यायचे होते.

गायकवाड समितीने अत्यंत अभ्यास करून आपला अहवाल सरकारकडे दिला होता. मात्र केवळ या समाजात आमदार, खासदार मंत्री आणि शिक्षण सम्राट असल्यामुळे मराठा आरक्षण नाकारले आहे.

उदयनराजे यांनी पुढे म्हटले आहे की, “समाजापुढे इतका अंधःकार पसरला आहे की मराठा समाजातील मुलांना सरकारने विष घेण्याची परवानगी देण्यात यावी. काही दिवसांनी नक्षलवादी तयार होतील. समाजात जाती पातीत तेढ निर्माण होतील.

आरक्षणाची केस न्यायालयात उभी राहिलेली असताना सरकारचा वकील हजर राहत नाही ही अत्यंत दुर्दैवी बाब राज्याने पहिली आहे. आता कुठल्याही पक्षाचा लोक प्रतिनिधी असुद्या, त्याला रस्त्यात अडवून तुम्ही आरक्षणासंदर्भात प्रश्न विचारायला हवा. उदयनराजे यांनी यावेळी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.