विधानसभेत लोकांचे प्रश्न मांडताना काही वेळा लोकप्रतिनिधी भावुक होतात. अनेकवेळा विधानसभेत लोकप्रतिनिधींना अश्रू देखील अनावर होतात. असाच काहीसा प्रकार राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांच्याबाबतीत घडला आहे. विधानसभेत लक्षवेधी लावत नसल्यामुळे आमदार सुनील शेळके यांना रडू कोसळले आहे. (mla sunil shealke crying in assembely)
विधानसभेत राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांनी पवना(Pavana) धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या संदर्भात लक्षवेधी लावली होती. पण कालपासून लक्षवेधी विधानसभेत लागत नसल्यामुळे आमदार सुनील शेळके नाराज झाले होते. त्यांनी विधानसभेत यावर भाष्य देखील केलं होतं. यावेळी नाराजी व्यक्त करताना आमदार सुनील शेळके यांना अश्रू अनावर झाले.
विधानसभेत राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके म्हणाले की, “जर पवना धरणामध्ये जमीन गेलेल्या शेतकऱ्यांचा विषय यांनी घेतला नाही, तर २०११ साली जे प्रकरण झालं होतं. याची पुन्हा पुनरावृत्ती होईल. कारण त्या वेळी जे आंदोलन झालं होतं ते याचं विषयासाठी झालं होतं. या प्रश्नासंदर्भात मी अजित पवार यांची भेट घेतली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यासंदर्भात चर्चा करण्याचं आश्वासन दिलं आहे.”
“त्यांना हा विषय मार्गी लावावाच लागेल, अन्यथा लढा उभा राहिल्याशिवाय राहणार नाही”, असे देखील आमदार सुनील शेळके विधानसभेत म्हणाले आहेत. काल महाविकास आघाडी सरकारने राज्यातील आमदारांसाठी मोठा निर्णय घेतला होता. राज्य सरकारने आमदारांसाठी मुंबईत ३०० घरे बांधण्याचा निर्णय घेतला होता.
या निर्णयाबाबत मत व्यक्त करताना आमदार सुनील शेळके विधानसभेत म्हणाले की, “आमदारांना घरं देण्याचा सरकारचा निर्णय स्वागतार्ह आहे. कारण अनेक आमदार असे आहेत जे लोकवर्गणीतून आमदार झाले आहेत. त्यांची परिस्थिती हलाखीची आहे. त्यांना घर मिळणे गरजेचं आहे. आमच्या सारख्या शहराच्या जवळ राहणाऱ्या सदन आमदारांनी मनाचा मोठेपणा दाखवावा”, असे देखील आमदार सुनील शेळके म्हणाले आहेत.
यावेळी आमदार सुनील शेळके यांनी विधानसभेत मावळ मतदारसंघाचे अनेक प्रश्न मांडले. वनविभागाची परवानगी मिळत नसल्यामुळे मतदारसंघातील कामे वेळेत होत नाहीत, असा आरोप आमदार सुनील शेळके यांनी केला आहे. यावेळी आमदार सुनील शेळके यांनी विधानसभेत वनविभागाचे नियम शिथिल करण्याची मागणी केली.
महत्वाच्या बातम्या :-
या चित्रात तुम्ही पहिल्यांदा काय पाहिले? त्यावरूनच कळेल तुमचे व्यक्तीमत्व कसे आहे? क्लिक करा आणि जाणून घ्या…
‘आमदारांना देण्यात येणारी घरे मोफत देणार नाही तर..,’ गदारोळ झाल्यानंतर जितेंद्र आव्हाडांचं स्पष्टीकरण
ज्याला भुताटकी म्हणायचे, तोच बंगला विकत घेऊन राजेश खन्नाचे चमकले नशीब; दिले अनेक हिट चित्रपट