एकनाथ शिंदे यांनी ५१ आमदारांना सोबत घेऊन पक्षाविरोधात बंडखोरी केली. त्यामुळे महाराष्ट्रात ठाकरे सरकार कोसळलं. यानंतर आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटातील आमदारांवर निशाणा साधला होता. गद्दार हे गद्दारचं असतात, असे म्हणत आदित्य ठाकरे(Aaditya Thakre) यांनी शिंदे गटातील आमदारांवर जोरदार टीका केली होती.(mla shambhuraj desai criticize aaditya thakare)
आता शिंदे गटातील आमदार शंभूराज देसाई यांनी आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर दिले आहे. “शिवसेना आमचं घर आहे. ३०-३५ वर्ष कष्ट करून शिवसेना आम्ही वाढवली आहे. आम्हाला गद्दार ठरवून आदित्य ठाकरे आमच्या घरातून शिवसेनेतून आम्हाला बाहेर काढू शकत नाहीत”, असे शिंदे गटातील आमदार शंभूराज देसाई यांनी सांगितले आहे.
शिंदे गटातील आमदार शंभूराज देसाई यांनी आज प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलत असताना आमदार शंभूराज देसाई म्हणाले की, “आदित्य ठाकरे शिवसेनेत येण्यापूर्वीपासून आम्ही पक्षासाठी काम करत आहोत. आम्ही ३०-३५ वर्ष कष्ट करून शिवसेना वाढवली आहे. मी १९८६ सालापासून शिवसेनेमध्ये आहे.”
“त्याकाळी सातारा जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जायचा. त्या ठिकाणी मी तीन वेळा निवडून आलो आहे. आता आदित्य ठाकरे आम्हाला गद्दार ठरवून शिवसेनेतून बाहेर काढणार असतील तर ते शक्य नाही. हे घर आमचं आहे. शिवसेना आम्ही कष्टाने उभी केली आहे”, असे शिंदे गटातील आमदार शंभूराज देसाई यांनी सांगितले.
आमदार शंभूराज देसाई पुढे म्हणाले की, “आदित्य ठाकरे यांच्याविषयी आम्हाला आदर आहे. पण त्यांनी आमच्याशी तशाच पद्धतीने बोलायला हवे. आम्ही शिवसेना पक्ष सोडलेला नाही. आम्ही बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे हिंदुत्वाचे विचार पुढे घेऊन जात आहोत”, असे शिंदे गटातील आमदार शंभूराज देसाई यांनी सांगितले.
पुढील विधानसभा निवडणुकीत आम्ही २०० जागा निवडून आणू, असा विश्वास शिंदे गटातील आमदार शंभूराज देसाई यांनी यावेळी व्यक्त केला. “मंत्रिमंडळ स्थापन झाल्यानंतर शिंदे गटातील सर्व आमदार आपापल्या मतदारसंघात फिरणार आहोत. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत आमचे १०० आणि भाजपचे १०० आमदार निवडून येतील, असे शिंदे गटातील आमदार शंभूराज देसाई यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या :-
अखेर चंद्रशेखर गुरुजींच्या हत्येमागील कारण आले समोर, चौकशीत झाला धक्कादायक खुलासा
‘शिवसेना हे आम्ही कष्टाने उभारलेलं घर, आदित्य ठाकरे आम्हाला घरातून बाहेर काढू शकत नाहीत’
आम्ही त्यांना असं अमृत पाजलय की त्यांची गाडी.., नितीन गडकरींचे एकनाथ शिंदेंबद्दल मोठे वक्तव्य