महिला आमदाराची दादागिरी! भाच्याची गाडी अडवली म्हणून पोलिसाच्या लावली कानशिलात

एका महिला आमदारावर पोलिस कॉन्स्टेबलच्या कानशिलात मारण्याचा आरोप लावण्यात आला आहे. कॉन्स्टेबलने आमदाराच्या भाच्याची गाडी अडवल्यामुळे महिला आमदाराने कॉन्स्टेबलच्या कानाखाली लगावली आहे, अशी माहिती समोर आली आहे.

कॉन्स्टेबलने महिला आमदाराच्या भाच्याची गाडी अडवून त्याला दंड ठोकला. याच कारणामुळे संतापलेली महिला आमदाराने कॉन्स्टेबलच्या कानाखाली चापट लगावली आहे. आता याप्रकरणी महिला आमदारावर गुन्हा दाखल करण्याच आला आहे.

संबंधित घटना राजस्थानच्या बांसवाडा जिल्ह्यातील कुशलगड या ठिकाणी घडली आहे. या भागातील महिला आमदार रमिला खरीया यांना आपल्या भाच्याची गाडी पकडल्याचा प्रचंड राग आणि त्या रागतच त्यांनी एका कॉन्स्टेबलच्या कानाखाली लगावली आहे.

ज्या कॉन्स्टेबलच्या कानाखाली महिला आमदाराने चापट मारली आहे, त्या हेड कॉन्स्टेबलचे नाव महेंद्र नाथ सिंह असे आहे. तसेच महेंद्र नाथ यांनी त्या महिला आमदाराविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

नाकाबंदी असल्याने दुचाकीवर जात असलेल्या एका तरुणाला पोलिसांनी पकडले. त्याचे नाव सुनील बारीया असे आहे. कोरोना काळात निर्बंधांमुळे गाडी पकडून प्रत्येकांची चौकशी केली जात होती. पण सुनीलला पकडल्याने त्याला प्रचंड राग आला.

तो पोलिसांशी वाद घालू लागला इतकेच नाही, तर त्याने पोलिसांची कॉलर पकडत त्याला नोकरीवरुन काढून टाकण्याची धमकी दिली. त्यामुळे हेड कॉन्स्टेबलने सुनीलवर कारवाई करत त्याच्यावर दंड ठोठावला.

सुनील रागात असल्यामुळे त्याने आमदार रमिला यांच्याकडे तक्रार केली. भाच्याची गाडी अडवल्यामुळे रमिला संतापल्या आणि त्यांनी कॉन्स्टेबलच्या कानाखाली लावली. त्यानंतर स्टेशन प्रभारी प्रदीप कुमारी यांनी महिला आमदाराला महेंद्र नाथ यांची माफी मागण्यास सांगितली पण रमिला यांनी माफी मागण्यास नकार दिला.

त्यामुळे पोलिस महेंद्र यांच्यासोबत उभे राहिले आणि जेवण नाकारत संपावर गेले. त्यामुळे पोलिसांनी महिला आमदाराविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच सोबतच महेंद्र विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे, कारण आमाराविरोधातील तक्रारीचा तपास सीबीआय करते. तसेच हे प्रकरणं सीबीआयकडे सोपविण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या-

लग्नाच्या पहिल्या रात्री शारीरिक संबंधादरम्यान पत्नीचा मृत्यू, समोर आले ‘हे’ कारण..
वाचा इंडस्ट्रीतील सर्वात बोल्ड अभिनेत्री झीनत अमानच्या तीन लग्नांची कहाणी
VIDEO: फटाकांच्या आवाजांमुळे हत्ती संतापला, वरातीत आलेल्या लाखो रुपयांच्या गाड्यांचा केला चुराडा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.