दौंडचे भाजप आमदार राहुल कुल यांना कोरोनाची लागण

 

पुणे | पुणे जिल्ह्यातील दौंडचे भाजप आमदार राहुल कुल यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.आमदार राहुल कुल यांनी स्वतःयाची माहिती आपल्या अधिकृत फेसबुक पेज वरून दिली आहे.

आमदार राहुल कुल यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांची कोरोना चाचणी करण्यात आली असून सर्व सदस्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.

आमदार राहुल कुल यांना कोरोनाची सौम्य लक्षणे दिसू लागल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती.

आमदार राहुल कुल यांनी फेसबुकच्या माध्यमातून माझा कोरोना रिपोर्ट जरी पॉझिटिव्ह आला असला तरी माझी प्रकृती स्थिर असून काळजी करण्याचे काही कारण नाही असा संदेश तालुक्यातील जनतेला दिला आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.