Share

मी विधानपरिषद सदस्याची मुलगी पळवून लग्न केलं, त्याच वेळी ठरवलं की एक ना एक दिवस आमदार व्हायचं’

भाजप आमदार प्रसाद लाड यांनी विधानसभेत आपल्या आयुष्यतील अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. यावेळी आमदार प्रसाद लाड यांनी एक विधान केलं आहे. या विधानामुळे आमदार प्रसाद लाड चर्चेत आले आहेत. “मी विधानपरिषद सदस्याची मुलगी पळवून लग्न केलं. मी त्याच वेळी ठरवलं की एक ना एक दिवस आमदार व्हायचं”,असं वक्तव्य भाजप आमदार प्रसाद लाड यांनी केलं आहे.(mla prasad lad statment about his marriage)

भाजप आमदार प्रसाद लाड विधानसभेत म्हणाले की, “मी संघर्षातून विश्व निर्माण केलं आहे. मी एका गरीब कुटुंबातील असून परळमधील एका छोट्या खोलीत राहिलो आहे. मी त्या ठिकाणाहून जीवनाला सुरवात केली आहे. कॉलेज काळात माझं प्रेमप्रकरण झालं होतं. तिच्याशीच मी लग्न केलं. माझ्या बायकोचे वडील बाबुराव पिपासे विधान परिषदेचे सदस्य होते.”

“त्यावेळी बाबुराव पिपासे यांचा जो रुबाब होता. तो पाहूनच मी ठरवलं होतं की एक ना एक दिवस आमदार व्हायचं. मी १९ व्या वर्षी लग्न केलं. त्यावेळी मी विधानपरिषद सदस्याची मुलगी पळवून लग्न केलं. विधान परिषद सदस्य बाबुराव पिपासे यांची मुलगी पळवून लग्न करणं, हि त्यावेळी फार मोठी गोष्ट होती”, असे भाजप आमदार प्रसाद लाड यांनी सांगितले.

भाजप आमदार प्रसाद लाड पुढे म्हणाले की, “माझ्या खिशात त्यावेळी पैसे नव्हते. मी टाइम्स ऑफ इंडियामध्ये हमाली करायचो. मी त्यावेळी टुरिस्ट गाडीने पुस्तक पोहचवायचो. त्यावेळी मला ७० रुपये पगार मिळायचा. त्यामधील ४० रुपये मी माझ्या बायकोला द्यायचो. उरलेल्या पैशांमध्ये मी समाजकारण करायचो. २०० साली मी पत्नीच्या मदतीने उद्योग सुरु केला. ”

“मला २१ व्या वर्षी मुलगी झाली. जयंत पाटलांमुळे मी ३१ व्या वर्षी सिद्धिविनायक न्यासाचा विश्वस्त झालो. या संघर्षातुन मी यशाची पायरी गाठली आहे”, असे भाजप आमदार प्रसाद लाड यांनी सांगितले. विधानसभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप आमदार प्रसाद लाड यांच्याबाबत एक मिश्किल विधान केलं आहे.

भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या मुलीच्या लग्नाचा संदर्भ देत विधानसभेत उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, “प्रसाद लाड हे सासरेबुवा झालेले आहेत. त्यामुळे सभागृहात काही मी घसरत नाही. प्रसाद लाड यांच्या नावातच प्रसाद आणि लाड आहे. आता कुणी कुणाला प्रसाद दिला आणि कुणी कुणाचे लाड केले हे मी काय बोलत नाही”, असे देखील उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या :-
थिएटरमध्ये जाऊन काश्मिर फाईल्स बघणाऱ्यांची संख्या झाली कमी, ‘ही’ दोन मुख्य कारणे आली समोर
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमबाबत रोहित शर्माने केले धक्कादायक वक्तव्य; म्हणाला, या स्टेडियमचा…
युट्युबने पालटले भावा बहीनीचे नशीब; एकेकाळी कर्जबाजारी होते पण आज लाखात कमवातहेत

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now