मोठ्या मनाचा आमदार! मुलाचे लग्न साधेपणाने करत वाचलेल्या पैशातून करणार लोकांचे लसीकरण

मुंबई । राज्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच आहेत.अनेकांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. अशात अनेकजण आपल्या परीने प्रयत्न मदत करत आहेत. कोविड रुग्णालये सुरु व्हावीत यासाठी कल्याणचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी त्यांच्या आमदार निधीतून एक कोटी रुपये देण्याचे जाहिर केले आहे.

विशेष म्हणजे आमदारांच्या मुलाचे लग्न आहे. हा लग्न सोगळा साधेपणाने करणार असून लग्नासाठी होणारा खर्च नागरीकांच्या लसीकरणासाठी करण्यात येणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले आहे. यामुळे त्यांचे कौतुक होत आहे.

महापालिका क्षेत्रात उपचारासाठी रुग्णांच्या नातवाईकांची पळापळ सुरू आहे. याठिकाणी इंजेक्शनचा, ऑक्सीजन बेडची मोठी कमतरता आहे. यामुळे उपचारासाठी नागरिकांची मोठी पळापळ सुरू आहे.

कल्याणमध्ये काही ठिकाणी कोविड रुग्णालये तयार होऊन सज्ज आहेत. यापूर्वी काही दिवसात हे रुग्णालय सुरु करण्याची घोषणा करण्यात आली होती. ऑक्सिजन उपलब्ध होत नसल्याने नव्याने कोविड रुग्णालय सुरु करा नका अशी माहिती प्रशासनाला सरकारने दिली आहे.

यामुळे अनेक अडचणी येत आहेत. ही अडचण लक्षात घेऊन आमदार गणपत गायकवाड यांनी ऑक्सिजनचा प्लांट उभारण्यासाठी त्यांच्या आमदार निधीतून एक कोटी रुपये देण्याचे जाहिर केले आहे. तसेच मुलाचे ४ मे रोजी लग्न आहे. कोविड वाढल्याने हे लग्न अत्यंत साधेपणा केले जाणार आहे.

आता या लग्नासाठी जो खर्च येणार होतो. ते सगळे पैसे मतदार संघातील नागरीकांच्या लसीकरणासाठी खर्च केले जाणार अशी माहिती आमदार गायकवाड यांनी दिली आहे. यामुळे अनेकांना मोठी मदत होणार आहे.

ताज्या बातम्या

आशा भोसले यांनी पळून जाऊन केले होते लग्न; वाचा लव्ह स्टोरी

कोल्हापुरातील हे मुस्लिम कुटुंबीय पुरणपोळी आणि कटाच्या आमटीवर सोडतात रोजाचा उपवास

ऑक्सिजन, रेमडेसिव्हिरची खरी गरज कधी लागते.? एम्सचे डॉक्टर म्हणतात..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.