Share

आमदार नितेश राणेंना जामीन मंजूर, न्यायालयाच्या ‘या’ अटी पाळाव्या लागणार

nitesha rane

भाजप(BJP) आमदार नितेश राणे(Nitesh Rane) यांचा जामीन अखेर न्यायालायने मंजूर केला आहे. आमदार नितेश राणे यांच्या अर्जावरील सुनावणी काल पूर्ण झाली होती. पण न्यायालायने याबाबतचा निकाल राखून ठेवला होता. आज न्यायालायने आमदार नितेश राणे यांचा जामीन मंजूर केला. गेल्या तीन दिवसांपासून आमदार नितेश राणे यांची तब्येत खालावली होती.( mla nitesh rane bail accepted)

भाजप आमदार नितेश राणे आणि त्यांच्या कुटूंबियांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. आमदार नितेश राणेंचे स्वीय सहायक राकेश परब यांचा देखील जामीन न्यायालयाने मंजूर केला आहे. न्यायालयाने जामीन मंजूर करत असताना आमदार नितेश राणे यांच्यावर काही अटी लादल्या आहेत. नितेश राणे यांना आठवड्यातून एक दिवस कणकवली पोलीस ठाण्यात हजेरी लावावी लागणार आहे.

तसेच चार्ज शीट दाखल होईपर्यंत आमदार नितेश राणेंना कणकवलीत न येण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. आमदार नितेश राणे यांना सिंधुदुर्गमधील शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील हल्ला प्रकरणात अटक करण्यात आली होती. या प्रकरणात आमदार नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला होता.

त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने आमदार नितेश राणे यांना नियमित जामीन मिळवण्यासाठी अर्ज करण्यास सांगितले होते. त्यानुसार आमदार नितेश राणे यांनी न्यायालयात नियमित जमीसाठी अर्ज केला होता. आमदार नितेश राणेंनी जामीन अर्ज मंजूर झाल्यानंतर भाजप नेत्यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे.

‘सत्य परेशान हो सकता है, पराजित नही’, अशा आशयाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. राज्य सरकारने सुडाचे राजकारण करत आमदार नितेश राणे यांना अटक केली होती, पण शेवटी सत्याचाच विजय झाला, अशा प्रतिक्रिया भाजप नेत्यांनी दिल्या आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यातील वातावरण ढवळून निघताना दिसत आहे.

सोमवारी आमदार नितेश राणे यांना छातीत दुखत असल्याने कोल्हापुरातील एका खाजगी रुग्णालयात दखल करण्यात आले होते. यावेळी त्यांच्या शरीराच्या काही चाचण्या देखील करण्यात आल्या होत्या. यावेळी आमदार नितेश राणे यांचा रक्तदाब वाढला होता. सध्या त्यांना स्पॉण्डिलायटिसचा त्रास होत आहे.

महत्वाच्या बातम्या :-
पुन्हा एकदा सबाचा हात पकडताना दिसला ह्रतिक रोशन; कॅमेरा पाहताच लपवले तोंड, पहा व्हिडिओ
राऊतांच्या आरोपांवर फडणवीसांचं प्रत्युत्तर म्हणाले, ‘सिंह कधी गिधाडाच्या धमकीला घाबरत नाही’
पहले हिजाब, फिर किताब; हिजाब प्रकरणावरून महाराष्ट्रातील मुस्लिम तरूणांची बॅनरबाजी, म्हणाले..

राजकारण

Join WhatsApp

Join Now