आज आमच्या दारात देव आला; आमदार निलेश लंके यांचा करमाळावासियांनी पाय धुवून केला सत्कार

महाराष्ट्रात कोरोना दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे. कोरोना काळात गोर गरीब जनतेला ऑक्सिजन, रेमडेसिवीरसाठी खूप वणवण फिरावे लागले. अशा बिकट प्रसंगात लोकप्रतिनिधींनी पण जनतेकडे पाठ फिरवली.

महाराष्ट्रात आमदार, खासदार यांनी त्यांच्या मतदार संघात कोविड रुग्णांसाठी कोविड सेंटर उभारली तर कोणी लोकांना अन्नाची मदत केली पण महाराष्ट्रात एका असा आमदार आहे ज्याने त्याच्या मतदार संघात थोडे थोडके नव्हे तर तब्बल १,१०० बेड्चे कोविड सेंटर उभारले.

१,१०० कोविड रुग्णांसाठी शरद पवार यांच्या नावाने कोविड सेंटर उभारणाऱ्या पारनेर नगर विधानसभा मतदार संघाचे आमदार निलेश लंके यांची देश परदेशात चर्चा आहे. कोविड सेंटर उभारूनच ते थांबले नाहीत तर त्यांनी त्यांचा निवास पण तिथेच हलवला.

जेवण पण घरी न करता दोन ते त्या रुग्णांसोबत घेत आहेत. आमदार निलेश लंके हे करमाळा जिल्हा सोलापूर येथे १०० कोविड सेंटरच्या उदघाटनासाठी शुक्रवार दिनांक ७ मेला गेले होते.

त्या प्रसंगी तेथील उपस्थित जनसमुदयाने आमदार निलेश लंके यांचे पाण्याने पाय धुवून स्वागत केले. आमदार लंके यांचे पाय धुवून स्वागत केल्यावर त्यांना हळद कुंकू लावले. त्यानंतर शाल, श्रीफळ आणि हार घालून त्यांचे स्वागत करण्यात आले.

या वेळी उपस्थित जनसमुदायाने आम्ही आज माणसात देव पाहिल्याची भावना व्यक्त केली. निलेश लंके यांनी देव तर देवळात राहतो असे म्हटल्यावर उपस्थित लोकांनी एका आवाजात देव आज आमच्या दारात आल्याचा जयघोष केला.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.