Share

मशिदींवरील भोंग्यासंदर्भात राज्य शासनाला अल्टिमेटम देणाऱ्या राज ठाकरे यांची औकात काय?

Raj-Thakre.

गेल्या काही दिवसांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे. ३ मे पर्यंत राज्य सरकारने मशिदींवरील भोंगे काढावेत, असं अल्टिमेटम देखील राज ठाकरे यांनी दिलं आहे. तुम्ही मशिदीवरील भोंगे नाही उतरवलेत तर आम्ही भोंगे लावून हनुमान चालिसा सुरु करु’, असं विधान राज ठाकरे(Raj Thakare) यांनी केलं आहे. यामुळे राज्यात सध्या मशिदींवरील भोंग्यांवरून राजकारण तापलं आहे.( mla lakshman mane statement on raj thakare)

मशिदींवरील भोंग्यांच्या भूमिकेवरून माजी आमदार लक्ष्मण माने यांनी राज ठाकरेंवर सडकून टीका केली आहे. “मशिदींवरील भोंग्यासंदर्भात राज्य शासनाला अल्टिमेटम देणाऱ्या राज ठाकरे यांची औकात काय आहे? घटनेनं सर्व धर्मांना स्वातंत्र्य दिलं आहे. राज ठाकरेंकडून दोन धर्मात द्वेष पसरवण्याचं काम सुरु आहे”, असे माजी आमदार लक्ष्मण माने यांनी सांगितले आहे.

गरज पडल्यास राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करेन, असा इशारा माजी आमदार लक्ष्मण माने यांनी दिला आहे. सातारा येथील विश्रामगृहात आज पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी ‘उपरा’ कार लक्ष्मण माने यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या पत्रकार परिषदेत माजी आमदार लक्ष्मण माने यांनी मशिदींवरील भोंग्यांच्या राजकारणावर भाष्य केलं.

माजी आमदार लक्ष्मण माने पत्रकार परिषदेत म्हणाले की, “राज ठाकरे यांनी देश समाजासाठी काय केले? ते नकलाच करतात. भोंग्यावर बोलतात. पण हे भोंगे आता लागले आहेत का? कोणाकडून तरी सुपारी घेऊन राज ठाकरे हे काम करत आहेत. भोंग्याला हात लावाल तर त्याला प्रतिकार करण्यात येईल”, असे लक्ष्मण माने यांनी सांगितले आहे.

“राज ठाकरे यांनी त्यांच्या आजोबांकडून काही तरी शिकायला हवे. त्यांचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे हे परिवर्तन चळवळीचे एक मोठे नेतृत्व होते. त्यांच्या विचारसरणीचा आदर्श राज ठाकरे यांनी घ्यावा. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केवळ ठाकरे घराण्यात जन्म घेण्याव्यतिरिक्त देशाच्या जडणघडणीत काय योगदान दिलं आहे”, असा सवाल माजी आमदार लक्ष्मण माने यांनी उपस्थित केला आहे.

मशिदींवरील भोंग्यांबाबत घेतलेल्या आक्रमक भूमिकेवरून प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडूंनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर टीका केली आहे. “मागील दोन वर्ष महाराष्ट्र कोरोनात होरपळत असताना मंदीर, मशिद, राजकीय सभा सगळे आवाज बंद होते एकच आवाज ऐकायला यायचा सेवेचा व रुग्णवाहिकेचा, यातुन प्रत्येकांनी बोध घ्यायला हवा. बंद करायचे असेल तर मंदिर, मशिदीसह राजकीय नेत्यांचे भोंगे बंद करा”, असं ट्विट आमदार बच्चू कडू यांनी केलं आहे.

महत्वाच्या बातम्या :-
भाजपा नेत्याचा घरचा आहेर; ‘आर्थिक प्रगतीचं लक्ष्य गाठण्यास नरेंद्र मोदी अपयशी’
चहलने हॅट्रीक घेताच धनश्री वर्माने सुरु केला डान्स, आनंदाच्या भरात मैदानातच…; व्हिडिओ झाला व्हायरल
राज ठाकरेंना फुले, शाहू आंबेडकरांची अँलर्जी का? राष्ट्रवादीचा परखड सवाल

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now