राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहितेंना हनिट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न; राष्ट्रवादी पदाधिकारीच आरोपी

पुणे जिल्ह्याच्या खेड येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांना बदनाम करण्याचा कट फसला आहे. तसेच या प्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हनीट्रॅपमध्ये आमदार मोहिते पाटील फसवण्याचा प्रयत्न केला जात होता. आता या प्रकरणी सातारा तालूका पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. धक्कादायक म्हणजे दिलीप मोहिते पाटलांना हनीट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न त्यांच्याच भावकीतील शैलेश पाटील यांनी केला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांना बदनाम करण्याचा कट फसला आहे. हा हनीट्रॅपमध्ये कधीकाळी आमदाकरांचा डावा हात असणाऱ्या शैलेश पाटील यांचा हात असल्याचे समोर आले आहे.

या प्रकरणी शैलेश मोहिते पाटील, राहूल कांगडे, सोमनाथ शेडगे या तिघांवर सातारा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सातारा पोलिसांनी सोमनाथला अटक केली आहे. शैलेशला शोधण्यासाठी एक पथक पुण्यात गेले होते, पण दोघांनाही पकडण्यात पोलिसांना अपयश आले आहे.

शैलेश हे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आहे. सबंधित तरुणीने भांडे फोड केल्याने या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शैलेश यांना आमदार व्हायचे होते. त्यासाठी त्यांनी हा कट रचला होता,अशी चर्चा सुरु आहे.

दरम्यान, या प्रकरणी आमदार दिलीप मोहिते पाटील प्रतिक्रीया दिली आहे. हनीट्रॅप रचण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. तेव्हा संबंधित तरुणी ही साताऱ्यातील आहे. माझं ते कार्यक्षेत्रही नाही. त्यामुळे ती तरुणी माझ्या ओळखीची असण्याचा प्रश्नच नाही. तसेच शैलेश मोहिते पाटील हा आमच्याच गावातला आहे, पण माझा आणि त्याचा काहीही संबंध नाही, असे दिलीप मोहिते पाटील यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-

काय सांगता! ट्विंकल खन्नामूळे अजय देवगनने वाजवली होती करिश्मा कपूरच्या कानाखाली
रुग्णांच्या मदतीला मंत्र्यांची मुलं सरसावली; कोणी मारतंय झाडू, तर कोणी उचलतंय गाद्या
देशात कोरोनाचा हाहाकार! एकाच दिवसात भाजप आणि काँग्रेसच्या ३ आमदारांचा मृत्यू

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.