बाळापूरचे शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख नागपूरमध्ये दाखल झाले आहेत. यामुळे एकनाथ शिंदे यांच्या गटाला मोठा धक्का बसला आहे. यावेळी शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांनी मोठा खुलासा केला आहे. “मला हृदयविकाराचा झटका आला नव्हता. मला बळजबरीने दंडावर इंजेक्शन देण्यात आले होते”, असा खुलासा शिवसेनेचे(Shivsena) आमदार नितीन देशमुख यांनी केला आहे.(MLA Deshmukh shared a thrilling experience)
यावेळी शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांनी गुजरात पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. ‘सुरतमध्ये मला मारहाण करण्यात आली होती. गुजरात पोलिसांनी मला जबरदस्तीने रुग्णालयात नेले होते”, असे शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांनी सांगितले आहे. यावेळी आमदार नितीन देशमुख यांनी आपण उद्धव ठाकरे यांचे शिवसैनिक असल्याचे सांगितले आहे.
नागपूर विमानतळावर दाखल झाल्यानंतर शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख म्हणाले की, “मला हृदयविकाराचा झटका आला नव्हता. गुजरात पोलिसांनी मला जबरदस्तीने रुग्णालयात नेले होते. मला दिडशे पोलिसांकडून मारहाण करण्यात आली होती. मला बळजबरीने दंडावर इंजेक्शन देण्यात आले होते”, असे शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांनी सांगितले आहे.
मी उद्धव ठाकरे यांचा शिवसैनिक आहे, असे शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांनी सांगितले आहे. तसेच आता अकोल्याला घरी जाणार असल्याचे देखील आमदार नितीन देशमुख यांनी सांगितले आहे. बाळापूरचे शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख एकनाथ शिंदे यांच्यासोबत सुरतला गेले होते. पण याबद्दल त्यांच्या कुटूंबियांना काही माहिती नव्हती.
शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांच्या पत्नीने काल अकोला शहरातील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. आपल्या पतीचे अपहरण करण्यात आले आहे, अशी तक्रार शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांची पत्नी प्रांजली देशमुख यांनी केली होती. ‘नितीन देशमुख यांनी काल रात्री मला फोन केला होता. त्यांनी मला अकोल्याला परत येणार असल्याचे सांगितले होते, पण ते परत आले नाहीत’, असे आमदार नितीन देशमुख यांच्या पत्नीने तक्रारीत म्हंटले होते.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी आमदार नितीन देशमुख यांचे अपहरण झाल्याचे ट्विट केले होते. “आमदार नितीन देशमुख हे सुरत येथे भाजपा तावडीत आहेत. मुंबईतून त्यांचे अपहरण केले. सोमवारी रात्री त्यांनी स्वतःची सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना गुजरात पोलीस व गुंडांनी बेदम मारहाण केली. मुंबईतील गुंड तेथे आहेत. गुजरातच्या भूमीवर हिंसा?”, असे ट्विट शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलं होतं.
महत्वाच्या बातम्या :-
शिंदे गटाला किती आमदारांचं किती समर्थन? बच्चू कडूंनी सांगीतला नेमका आकडा
बंडखोरी शमवायला शिवसेना कृषिमंत्री भुसेंचा उपयोग करणार? शिंदेंसोबतचे ‘ते’ नाते कामी येणार?
काल रात्री आदित्य ठाकरेंसोबत फिरणारा शिवसेनेचा ‘तो’ माजी मंत्रीही शिंदेना सामील; गुवाहाटीला रवाणा