भाजप आमदाराला शेतकऱ्यांनी चोपले, कपडे फाडत काळे फासले

चंदीगड | दिल्लीच्या सीमेवर केंद्र सरकारविरोधात शेतकरी आंदोलन करत आहेत. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला संपुर्ण देशभरातून पाठिंबा मिळत आहे. शेतकरी आणि केंद्र सरकारमध्ये अनेकवेळा बैठक होऊनही तोडगा निघाला नाही. दिवसेंदिवस शेतकऱ्यांचा सरकारविरोधात संताप वाढत चालला आहे.

शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश राज्यातील शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. शेतकरी आपआपल्या राज्यांमध्ये सुध्दा मोदी सरकारविरोधात आंदोलन करत आहेत. याच आंदोलना दरम्यान एका भाजपच्या आमदाराला स्थानिक शेतकऱ्यांनी चोपले आहे.

पंजाबमधील मलोट शहरात भाजप आमदार अरूण नारंग पत्रकार परिषद घेण्यासाठी आले होते. त्याआधीच मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. अखेर कारमधून आमदार अरूण नारंग आले असता शेतकरी संतप्त झाले आणि त्यांनी नारंग यांना मारहाण करत त्यांचे कपडे फाडले आहेत.

शेतकरी एवढ्यावरच न थांबता त्यांनी नारंग यांच्या तोंडावर काळी शाई फेकली. त्यानंतर त्यांच्या स्कॉर्पिओ कारवर काळी शाई फेकली. पोलिसांनी तात्काळ धाव घेत आंदोलक शेतकऱ्यांच्या तावडीतून नारंग यांची सुटका केली. सोशल मिडियावर आमदाराला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

राज्यातील सत्ताधारी काँग्रेस सरकारला चार वर्ष पुर्ण झाल्यानंतर त्यांच्या विरोधात टीका करण्यासाठी भाजप कार्यालयात ही पत्रकार परिषद आयोजित केली होती. आमदार नारंग यांच्यासह भाजपचे नेते, कार्यकर्ते या पत्रकार परिषदेला उपस्थित झाले होते.

दरम्यान पोलिसांच्या समोरच भाजप आमदाराला बेदम मारहाण करण्यात आल्याने भाजपच्या नेत्यांनी पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. तसेच शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.
महत्वाच्या बातम्या-
मोदींनी खरंच घेतला होता बांगलादेश स्वातंत्र्यसंग्रामात सहभाग? समोर आला ‘हा’ महत्वाचा पुरावा
‘कोरोनाला रोखण्यासाठी नाईट कर्फ्यू जास्त उपयोगाचं नाही, तर…’
“मोदीजी हे आतापर्यंत भारताला लाभलेले सर्वोत्तम जागतिक नेते – नरेंद्र मोदी”
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बांग्लादेश दौऱ्याला विरोध, हिंसक आंदोलनात ४ आदोलकांचा मृत्यू

 

 

 

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.