पलंगावर झोपल्यामूळे मिथून चक्रवर्तीची झाली होती धुलाई; वाचा पुर्ण किस्सा

मिथून चक्रवर्तीला बॉलीवूडचे डिस्को डान्सर म्हणून ओळखले जाते. आजही लाखो लोकं त्यांच्या डान्सचे आणि अभिनयाचे दिवाने आहेत. सध्या ते चित्रपटांपासून दुर असले तरी राजकारणात सक्रिय झाले आहेत.

आज बॉलीवूडचे स्टार म्हणून ओळख असणारे मिथून एकेकाळी इंडस्ट्रीमध्ये काम मिळवण्यासाठी मेहनत करत होते. चित्रपटांमध्ये छोट्या मोठ्या भुमिका मिळाव्यात म्हणून ते मेहनत करायचे. अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर त्यांना हे यश मिळाले आहे.

करिअरच्या सुरुवातीला त्यांना चित्रपटांमध्ये काम मिळत नव्हते. म्हणून त्यांनी अनेक छोटी मोठी काम केली. त्यांनी हेलनसोबत बॅकग्राऊंड डान्सर म्हणून काम केले. तर कधी रेखाचा स्पॉट बॉय म्हणून काम केले. एवढ्या मेहनतीनंतर त्यांना यश मिळाले आहे.

करिअरच्या सुरुवातीला पैसे नव्हते. त्यावेळी ते मुंबईतील चालींमध्ये किंवा गेस्ट हाऊसमध्ये राहायचे. पैशांच्या कमीमूळे त्यांना अनेकदा रुम बदलावी लागत होती. याच कालावधीमध्ये त्यांनी पलंगावर झोपल्यामूळे मार खाल्ला होता. जाणून घेऊया पुर्ण किस्सा.

हा किस्सा आहे ८० च्या दशकतील मिथून चक्रवर्तीने त्यांच्या करिअरची सुरुवात केली होती. पण त्यांना जास्त काम मिळत नव्हते. पैसे नसल्यामूळे त्यांच्या राहायला अनेक अडचणी निर्माण होत होत्या. मिथून मित्रांसोबत गेस्ट हाऊसमध्ये राहत होते.

त्यावेळी एका रुममध्ये पाच ते सहा लोकं राहायचे. त्यातही तुम्हाला गादीवर झोपायचे असेल तर मग जास्त पैसे द्यावे लागत होते. एका गादीचे भाडे ७५ रुपयाच्यावर होते. मिथूनला एवढे पैसे देणे परवडत नव्हते. म्हणून ते खाली जमिनीवर झोपायचे.

पण एकदा रुममध्ये कोणी नव्हते. त्यामूळे मिथून गादीवर झोपी गेले. ज्यावेळी रुममधले दुसरे लोकं तिथे आले त्यांनी मिथूनला गादीवर झोपलेले पाहीले. हे दृश्य पाहून त्यांना राग आला आणि त्यांनी मिथूनला मारायला सुरुवात केली.

झोपलेले मिथून खडबडून जागी झाले आणि त्यांनी माफी मागितली. माफी मागितल्यानंतर त्या लोकांनी मिथूनला सोडून दिले. त्या दिवशी एका एका गादीसाठी मार खाणारे मिथून चक्रवर्ती आज करोडोंच्या संपत्तीचे मालक आहेत आणि आपल्या कुटूंबासोबत सुखाने जगत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

दिलबर गर्ल नोरा फतेहीचा नवीन लुक; फोटो पाहून चाहते झाले आनंदी

काका ऋषी कपूरसोबत रोमान्स करण्याचा हट्ट करून बसली होती करिश्मा; त्यांनी दिला ‘हा’ सल्ल

एका विवाहित पुरुषाच्यामागे झाली होती वेडी, रेखा यांनी दिली कबुली; म्हणाल्या…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.