मिताली राज बनली सर्वाधिक धावा करणारी महिला क्रिकेटपटू; भल्याभल्यांना टाकले मागे

मुंबई | भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजने शुक्रवारी आपल्या नावावर नव्या विक्रमाची नोंद केली. ती आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १० हाजारांपेक्षा जास्त धावा करणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटर बनली आहे. तर हा विक्रम करणारी विश्व क्रिकेटमधील ती दुसरी फलंदाज ठरली आहे.

साऊथ आफ्रिकेविरोधातल्या तिसऱ्या सामन्यात मितालीने ही कामगिरी केली आहे. तिने या सामन्यात ५० चेंडूमध्ये ५ चौकारांच्या मदतीने ३६ धावा केल्या. याबरोबरच तिने या नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १० हजार धावा पूर्ण करणारी मिताली राज ही दुसरी महिला फलंदाज आहे. तिने ३११ सामने खेळत हा विक्रम केला आहे. यादरम्यान, मितालीने ८ शतकं आणि ७५ अर्धशतक ठोकली आहेत.

मितालीने १९९९ मध्ये क्रिकेट विश्वात पदार्पण केले होते. तेव्हापासून तिने भारतीय संघासाठी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. याशिवाय मितालीने १० कसोटी, २११ एकदिवसीय  आणि ८९ टी-२० समान्यात भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १० हजार धावांचा टप्पा केवळ  दोनच महिला खेळाडूंनी ओलांडला आहे. यामध्ये पहिल्या क्रमांकावर इंग्लंडची माजी कर्णधार शार्लोट एडवर्ड्स ही आहे. आता भारताच्या मिताली राजने हा मैलाचा दगड पार केला आहे. यानंतर  आणखी बराच काळ मिताली राजचं वादळ महिला क्रिकेटमध्ये घोंघावणार आहे.

महत्वाच्या बातम्या-
जणू काही सेहवागच फलंदाजी करत होता असं वाटलं; माजी क्रिकेटपटूने केले पंतचे कौतुक
खोटं खेळून सेहवागचे शतक हुकवणाऱ्या खेळाडूवर आता आलीय ड्रायव्हरची नोकरी करून पोट भरण्याची वेळ
सडलेले पाव आणि अंडी खायला दिली जातात,” ‘या’ खेळाडूने केली पाकिस्तान क्रिकेट बोर्डची पोलखोल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.