लग्नानंतर मिसेस चांदेकरांचा मेकओव्हर; फोटो पाहून तुमचाही बसणार नाही विश्वास

मुंबई | सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकर नुकतेच विवाहबंधनात अडकले आहेत. या लग्नसोहळ्याला मराठी कलाविश्वातील अनेक मराठी सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. याचबरोबर त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

याचबरोबर नुकतेच लग्न बंधनात अडकलेल्या मितालीने लग्नानंतर केलेल्या मेकओव्हरचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये मितालीने तिचा हेअर कट केल्याचे दिसून येत आहे. सध्या सोशल मीडियावर मितालीचा एक फोटो व्हायरल होत आहे.

दरम्यान, मितालीने Before आणि After असे दोन फोटो शेअर केले आहेत. यामध्ये एका फोटोत तिचे लांबसडक केस दिसून येत आहेत. तर, दुसऱ्या फोटोमध्ये मितालीने केलेला हेअरकट पाहायला मिळत आहे. सध्या या फोटोंची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे.

लग्न झाल्यानंतर मितालीचा महत्त्वाचा निर्णय…
नुकतेच लग्न बंधनात अडकलेल्या मितालीने एक निर्णय घेतला आहे. मितालीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटमध्येच एक बदल केला आहे. तिने कोणताही फोटो किंवा व्हिडीओ शेअर केला नसून सोशल मीडियावरील तिच्या नावात बदल केला आहे.

लग्नाआधी मिताली मयेकर असे तिच्या अकाऊंटचे नाव होते. मात्र आता तिने मिताली मयेकर-चांदेकर असे नाव केले आहे. खास बाब म्हणजे लग्न झाल्यानंतर काही दिवसांमध्येच मितालीने तिचं नाव बदलल्याने ती आता चांगलीच चर्चेत आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या
मनसेमधील आऊटगोईंग थांबेना! बड्या नेत्याने केला भाजपात प्रवेश
शिवसेनेच्या ढाण्या वाघाची दिल्लीत डरकाळी; संजय राऊत पोहचले गाझीपूर बॉर्डरवर
‘राम मंदिरासाठी मिळालेल्या दानातून भाजपचे नेते दारू ढोसतात’

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.