भारतीय महिला क्रिकेट संघाची एकदिवसीय आणि कसोटी कर्णधार मिताली राजने आज सर्व प्रकारातील आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. मिताली राजने २३ वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते. मिताली राजने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून पोस्ट करत निवृत्ती संदर्भातील माहिती दिली आहे.(mitali-raj-started-new-inning social media retirement post)
या पोस्टमध्ये मिताली राजने लवकरच नवीन काहीतरी सुरु करणार असल्याचे सांगितले आहे. भारतीय महिला खेळाडू मिताली राजने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “हा प्रवास देखील संपला असून आता लवकरच नवीन काहीतरी सुरु करेन. मला या खेळात गुंतून राहायला आवडेल. मला भारतातील आणि जगातील महिला क्रिकेटच्या वाढीसाठी मदत करायची आहे”, असे मिताली राजने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे.
त्यामुळे मिताली राज मुलींसाठी क्रिकेट अकादमी सुरु करणार असल्याचे सांगितले जात आहे. तसेच मिताली राज निवृत्तीनंतर भारतीय महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षक पदाची धुरा सांभाळू शकते, अशी माहिती मिळत आहे. मिताली राजला २३ वर्षांचा क्रिकेट अनुभव आहे. त्यामुळे तिच्या अनुभवाचा भारतीय संघाला फायदा होऊ शकतो, असे क्रिकेट तज्ज्ञांनी सांगितले आहे.
मिताली राजने आपल्या निवृत्तीच्या पोस्टमध्ये पुढे लिहिले आहे की, “मला भारतीय संघाची निळी जर्सी क्रिकेट दौऱ्यावर जाण्याची लहानपणापासून इच्छा होती. कारण आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करणे हा प्रत्येकासाठी सर्वात मोठा सन्मान असतो. या प्रवासात काही चढउतार आले. प्रत्येक क्षण मला काहीतरी नवीन शिकवत होता.”
“ही 23 वर्षे माझ्या आयुष्यातील सर्वात समाधानकारक, संघर्षपूर्ण आणि आनंददायक वर्षे आहेत. आज मी सर्व प्रकारातील आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करत आहेत. माझ्या मते माझ्यासाठी निवृत्तीची हीच योग्य वेळ आहे. भारतीय संघ सुरक्षित हातात आहे. संघात अनेक युवा प्रतिभावान खेळाडू आहेत”, असे मिताली राजने आपल्या निवृत्तीच्या पोस्टमध्ये लिहिले आहे.
Thank you for all your love & support over the years!
I look forward to my 2nd innings with your blessing and support. pic.twitter.com/OkPUICcU4u— Mithali Raj (@M_Raj03) June 8, 2022
मिताली राजने भारतीय संघासाठी १२ कसोटी, २३२ एकदिवसीय आणि ८९ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. मिताली राजने २३२ एकदिवसीय सामन्यांमध्ये ७८०५ धावा केल्या आहेत. तसेच मिताली राजने ८९ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये २३६४ धावा केल्या आहेत. मिताली राज ही जगातील एकमेव महिला क्रिकेटपटू आहे जिने ७००० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या :-
राज ठाकरेंनी खोलले पत्ते; राज्यसभा निवडणूकीत मनसे आमदाराचे मत ‘या’ पक्षाला मिळणार
बापरे! बायकोमूळे राजेश खन्नाने सुपरस्टार मनोज कुमारवर हात उचलला होता; वाचा पुर्ण किस्सा
बातमी शेतकऱ्यांसाठी! मोदी सरकारचे शेतकऱ्यांना मोठे गिफ्ट, ‘या’ १७ पिकांचा भाव वाढवला