मिताली मयेकरच्या ‘मंगळसूत्रा’ची सर्वत्र चर्चा; पहा तुफान व्हायरल झालेले खास फोटो

मुंबई | सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकर नुकतेच विवाहबंधनात अडकले आहेत. या लग्नसोहळ्याला मराठी कलाविश्वातील अनेक मराठी सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. याचबरोबर त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

याचबरोबर कलाविश्वापासून ते चाहत्यांपर्यंत सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकर यांच्या लग्नाची चर्चा झाली. त्यांच्या लग्नाचे अनेक फोटो, व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाले.

तर आता मितालीच्या मंगळसूत्राची चर्चा रंगली आहे. या चर्चा मितालीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीला शेअर केलेल्या फोटोमुळे सुरु झाल्या. चाहत्यांना मितालीचे हे मंगळसूत्र आवडले आहे. या फोटोत मिताली देखील अधिकच सुंदर दिसत आहे. या सोबतच मंगळसूत्रात तिच्या चेहऱ्यावरची कळी आणखीनच खुलून आली आहे.

दरम्यान, याचबरोबर नुकतेच लग्न बंधनात अडकलेल्या मितालीने एक निर्णय घेतला आहे. मितालीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटमध्येच एक बदल केला आहे. तिने कोणताही फोटो किंवा व्हिडीओ शेअर केला नसून सोशल मीडियावरील तिच्या नावात बदल केला आहे.

लग्नाआधी मिताली मयेकर असे तिच्या अकाऊंटचे नाव होते. मात्र आता तिने मिताली मयेकर-चांदेकर असे नाव केले आहे. खास बाब म्हणजे लग्न झाल्यानंतर काही दिवसांमध्येच मितालीने तिचं नाव बदलल्याने ती आता चांगलीच चर्चेत आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या
सावधान! तुम्हाला पूजा शर्माचा व्हिडीओ कॉल तर नाही येत? मुंबईत सेक्सटॉर्शनचा पर्दाफाश !
खुशखबर! ‘या’ बँकेची धमाकेदार बचत योजना; फक्त ५ रुपयांमध्ये उघडा खातं आणि मिळवा १ लाख
संजय राठोडांसाठीचा ‘तो’ मेसेज होतोय व्हायरल; वाचा नेमकं काय त्या मेसेजमध्ये

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.