‘मिस यू भाऊ’! पुण्यात सराईत गुंडाच्या अंत्यविधीला १२५ बाईक्सची रॅली; हजारोंची गर्दी

पुण्यातील बिबवेवाडी परिसरात शनिवारी मध्यरात्री एका गुंडाची हत्या करण्यात आली. त्याची आठ ते दहा जणांनी सपासप वर करून हत्या केली. हत्या झाल्यानंतर गुन्हेगाराच्या अंत्यविधीला १२५ जणांनी दुचाकी गाड्या घेऊन हजेरी लावली.

या अंत्यविधीला उपस्थित असलेल्या प्रत्येकाचा तपास पोलीस करत आहेत. कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव लक्षात घेता फक्त २५ जणांना अंत्यविधीसाठी परवानगी देण्यात आली आहे.

त्यामुळे पुण्यातच १२५ जणांनी हजेरी लावल्यामुळे सगळीकडून आश्चर्य व्यक्त आहे. हत्या झालेल्या गुन्हेगाराचे नाव माधव वाघाटे असे असून सावन गवळी, पवन गवळी, गोपाळ ढावरे, सुनील घाटे, शुभम तनपुरे असे सर्व आरोपी पण बिबवेवाडी परिसरात राहणारे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी मध्यरात्री माधव वाघाटे याला भांडण झाल्याचा फोन आला. त्यानंतर तो बिबवेवाडी चौकी परिसरातील ओटा मार्केट येथे पोहोचला. तेव्हा तिथे अगोदरच ८ ते १० जण दबा धरून बसले होते.

माधव वाघाटेला काही समजत नाही तोच त्याच्यावर ट्युब, लोखंडी रॉड आणि चाकूने सपासप वार करण्यात आले. त्यातच त्याचा जागीच मृत्यू झाला. गोपाळ ढावरे आणि शुभम तनपुरे यांना काही वेळात अटक करण्यात आली असून बाकीच्या आरोपींचा शोध घेण्याचे पण काम चालू आहे.

मयत माधव वाघाटे याच्या अंत्यविधीला मोठ्या प्रमाणावर मित्र परिवार उपस्थित होता. त्याच्या घरापासून ते कात्रज स्मशानभूमीपर्यंत तब्बल १२५ हून अधिक जण दुचाकीवरून रॅली काढत सहभागी झाले. या घटनेत सहभागी झालेल्यांचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यापैकी १० जणांना पोलीस्नी ताब्यात घेतले आहे.

ताज्या बातम्या
पंतप्रधान नेत्यानाहूंनी इस्रायलला पाठींबा देणाऱ्या सर्व देशांचे मानले आभार; मात्र भारताचे नावही नाही घेतले

मराठमोळ्या श्रेयसला बाॅलीवूडमध्ये सिनेमे का मिळत नाहीत? स्वत: श्रेयसनेच सांगीतले ‘ते’ घाणेरडे कारण

रियल सिंघमने उडवली दौंडमधील काळे धंदेवाल्यांची झोप! सर्व धंदे बंद करत केला साडेचार कोटींचा माल जप्त

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.