मेक्सिकोची ऍन्ड्रिया मेझा ठरली ‘मिस युनिव्हर्स’; पहा जगातील सर्वात सुंदर महिलेचे फोटो

फ्लोराडिया | अवघ्या जगाचं लक्ष लागलेल्या ६९ व्या मिस युनिव्हर्सच्या स्पर्धेचा निकाल लागला आहे. मिस मेक्सिको असलेल्या ऍन्ड्रिया मेझाने या वर्षीची मिस युनिव्हर्स ही सौंदर्य स्पर्धा जिंकली आहे. भारताच्या अँडलिन कॅसेलिनोला स्पर्धेत चौथ्या स्थानावर समाधान मानावं लागलं आहे.

मिस युनिव्हर्स स्पर्धेचे हे ६९ वे वर्ष होते. कोरोना महामारीमुळे गेल्या वर्षीची मिस युनिव्हर्स ही स्पर्धा पुढे ढकलून यंदाच्या वर्षी घेण्यात आली. जगभरातील सौंदर्यवतींनी या स्पर्धेत भाग घेतला होता. त्यापैकी चार तरुणींना अंतिम फेरीपर्यंत धडक मारता आली.

अंतिम फेरीत पेरुची जॅनक मसिट, भारताची अँडलिन कॅसलिनो, ब्राझिलची जुलिया गामा आणि मेक्सिकोची ऍन्ड्रिया मेझा यांच्यात जोरदार टक्कर पाहायला मिळाली. यामध्ये मेक्सिकोच्या ऍन्ड्रिया मेझाने बाजी मारत पाचव्यांदा मेक्सिकोला मिस युनिव्हर्सचा मुकुट मिळवून दिला.

२०१९ मधील विजेता झोजीबिनी तुंझी हिच्या हस्ते ऍन्ड्रियाला सन्मानित करण्यात आले आहे. सध्या ऍन्ड्रिया मेझा या सौंदर्यवतीवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

दरम्यान, भारताच्या अँडलिन कॅसेलिनोने हा किताब जिंकला असता तर अशी कामगिरी करणारी ती तिसरी भारतीय महिला ठरली असती. या पुर्वी १९९४ साली सुश्मिता सेन आणि २००० साली लारा दत्ता यांनी हा किताब जिंकला आहे.

भारताच्या अँडलिन कॅसलिनोचा जन्म कुवेत येथे झाला. वयाच्या १५ व्या वर्षी ती भारतात आली. तिची पार्श्वभूमी शेतकरी कुटुंबाची असून तिचे पालक कर्नाटकातील उदयवारा येथील आहेत.

महत्वाच्या बातम्या-
.. आणि विराट कोहलीने ते स्वप्न केले पूर्ण, ६ वर्षांपासून त्यासाठी झटतोय, जाणून घ्या
प्रसिद्ध कोरिओग्राफर गीता कपूरने गुपचूप केले लग्न? भांगात कुंकू भरलेले फोटो आले समोर
प्राजक्ता गायकवाडचे लवकरच ‘लॉकडाऊन लग्न’; पहा तयारीचे व्हिडिओ आणि फोटोज

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.