मिर्झापुर सीरीजमधील अभिनेत्यावर आली वाईट वेळ? अक्षरश रस्त्यावर लाडू विकतोय

कोरोना महामारीमुळे झालेल्या लॉकडाऊमुळे सगळे उद्योगधंडे ठप्प पडले आहेत. त्यामुळे अनेक लोकांना आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. अनेक लोक बेघर झाले आहेत तर अनेक लोकांना आपला मुख्य व्यवसाय सोडून दुसरा व्यवसाय करण्यास या कोरोनाने भाग पाडले आहे.

बॉलिवूडमध्येही हीच परिस्थिती आहे. चित्रिकरण थांबल्यामुळे अनेक कलाकारांवर आर्थिक संकट कोसळले आहे. मिर्झापूर वेब सिरीजमधील काम करणारे अभिनेते राजेश तैलंगवर आर्थिक संकट कोसळले आहे. त्यांचा रस्त्यावर रामलड्डू विकतानाचा फोटो सध्या सोशल मिडीयावर धुमाकूळ घालत आहे.

राजेश तैलंग यांनी स्वताच हा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ते रस्त्यावर रामलड्डू विकताना दिसत आहेत. हा फोटो शेअर करत त्यांनी लिहीले आहे की लॉकडाऊन खुले, कोरोना जाए तो फिर से धंदे पर लगें, असे कॅप्शन त्यांनी दिले आहे.

राजेश यांच्या पोस्टवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींना हा फोटो त्यांच्या येणाऱ्या चित्रपटातील वाटत आहे तर काही लोकांना वाटत आहे की ते आर्थिक संकटात आहे. त्यांच्यावर आर्थिक संकट आल्याने ते रामलड्डू विकत आहेत.

राजेश यांनी मिर्झापूर या अतिशय लोकप्रिय वेब सिरीजमध्ये काम केले आहे. त्यांनी गुड्डू भय्याच्या वडिलांची म्हणजे रमाकांत पंडित यांची भूमिका साकारली होती. त्यांच्या या भुमिकेला प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळाले होते. त्यांना या भुमिकेमुळे खुप लोकप्रियता मिळाली होती.

त्यांनी ढाई अक्षर या मालिकेतही काम केले आहे. पण त्यांच्या या फोटोने सगळ्यांना विचारात पाडले आहे. अनेक लोकांनी त्यांना मास्क घालण्याचा सल्ला दिला आहे. तर काहींनी नेमका हा फोटो त्यांनी का पोस्ट केला आहे? असे प्रश्न त्यांना काहींनी विचारले आहेत.

महत्वाच्या बातम्या
रणबीर कपूरसाठी कतरिनाने फक्त एक मेसेज करुन सलमान खानसोबत केले ब्रेकअप
२४ वर्ष मोठ्या मुलीच्या प्रेमात पडले होते कमल हसन, लग्नही केले पण शेवटी…
एकीचे बळ! मधमाश्यांनी उघडले प्लास्टीकच्या बाटलीचे झाकण, व्हिडीओ पाहून अवाक व्हाल
संभाजीराजेंनी फडणवीसांनी हात जोडून सांगीतलं तुझं माझं करू नका, समाजासाठी एकत्र या; वाचा काय ठरलं भेटीत

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.