नाशिकमधील त्र्यंबकेश्वर मंदिर चर्चेत आले आहे. नाशिकमधील त्र्यंबकेश्वर मंदिरातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये त्र्यंबकेश्वर(Trimbkeshvar) मंदिरातील मुख्य पिंडीवर बर्फ जमा झाल्याचे दिसत आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरातील पुजाऱ्यांनी मुख्य पिंडीवर बर्फ जमा झाल्याचा दावा देखील केला आहे.(Miracle happened in Trimbakeshwar temple after 60 years, you will be amazed to see the photos)
यासंदर्भात शहानिशा करण्यासाठी त्या ठिकाणी असलेले प्रशासनाचे अधिकारी त्र्यंबकेश्वर मंदिरात पोहचल्याची माहिती मिळत आहे. अधिकाऱ्यांनी मंदिरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जाणार आहे. मुख्य पिंडीवर खरंच बर्फ जमा झाला आहे का? याची चौकशी प्रशासनाचे अधिकारी करणार आहेत. याबाबत नवनवीन दावे समोर येत आहेत.
१९६२ साली भारत आणि चीन युद्धाच्या दरम्यान देखील मुख्य पिंडीवर अशाच प्रकारे बर्फ जमा झाला होता, अशी माहिती त्र्यंबकेश्वर मंदिराच्या पुजाऱ्यांनी दिली. ईशान्य भारतामध्ये संकट आल्यामुळे हा चमत्कार झाला आहे. ईशान्य भारतातील आसाममध्ये सध्या महापूर आला आहे, यामुळे त्र्यंबकेश्वर मंदिराच्या मुख्य पिंडीवर बर्फ झाला आहे, असे मंदिराच्या पुजाऱ्यांनी सांगितले आहे.
हा चमत्कार भगवान शंकरानेच केला आहे, असा दावा मंदिराच्या पुजाऱ्यांनी केला आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून यासंदर्भातील सत्यता समोर आणली जाईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. नाशिकमधील त्र्यंबकेश्वर मंदिर हे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे. देशभरातील भाविक त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये दर्शनासाठी येत असतात.
त्र्यंबकेश्वरमध्ये संत निवृत्तीनाथ मंदिर, कुशावर्त तीर्थ, ब्रम्हगिरी अशी पर्यटन स्थळे आहेत. या ठिकाणी अनेक पर्यटक भेट देण्यासाठी येत असतात. त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये अनेक भाविक दर्शनासाठी गर्दी करतात. मुख्य पिंडीवर बर्फ जमा झाल्याची बातमी समोर येताच भाविक त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये हे पाहण्यासाठी येत आहेत.
महत्वाच्या बातम्या :-
उदयपूरमधील हिंदू युवकाच्या हत्येला सर्वस्वी भाजपची नुपूर शर्मा जबाबदार – सर्वोच्च न्यायालयाने झापले
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप! मध्यरात्री धनंजय मुंडेंनी घेतली फडणवीसांची भेट
‘…तोपर्यंत एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदावर ठेवलं जाईल,’ संजय राऊतांनी केलं भाकित