…म्हणून ऑलिम्पिक मेडल जिंकल्यानंतर ‘त्या’ ट्रक ड्रायव्हर्सला शोधतेय मीराबाई चानू

क्यो ऑलिम्पिकमध्ये वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानूने दुसरा क्रमांक पटकावत भारताला सिल्वर मेडल जिंकून दिले आहे. भारताला ऑलिम्पिकमध्ये वेटलिफ्टिंग स्पर्धेत सिल्वर मेडल मिळवून देणारी पहिली बनली आहे.

आपल्या आयुष्यात कितीही अडचणी आल्यातरीही यशाच्या शिखरापर्यंत पोहचण्यासाठी आपल्याला कोणी रोखू शकत नाही, हे मीराबाई चानूने सिद्ध करुन दाखवले आहे. भारतामध्ये आल्यानंतर मीराबाईचे जोरदार स्वागत करण्यात आले आहे.

अशात अनेक लोकांनी तिला बक्षिसे देऊन सम्मानित केले, पण तिचा आतापर्यंतचा प्रवास खुप कठिण होता. तिच्या या प्रवासात काही लोकांनी तिची मदतही केली होती. अशाच एका मदतगाराला मीराबाई चानू शोधत आहे.

मीराबाई चानूची आर्थिक परिस्थिती खुप हालाखीची होती. त्यामुळे तिला पैशांमुळे अनेक अडचणी यायच्या. तेव्हा एक ट्रक ड्रायव्हर चानूला तिच्या घरापासून खुमान लंम्पक स्पोर्ट्स कॉम्लेक्स येथील प्रशिक्षण केंद्रापर्यंत रोज मोफत न्यायचे.

परिस्थिती आधी खुप हालाखीची असल्याने त्यांना रोजच्या प्रशिक्षणावर होणारा खर्च परवडणारा नव्हता. चानूच्या घरापासून तिचे प्रशिक्षण केंद्र ३० किलोमीटर लांब होते. तिकडे जाण्यासाठी तिला १०-२० रुपये दिले जायचे. पण ते पुरायचे नाही. त्यावेळी मीराबाईने त्यावर एक मार्ग काढला होता. तो म्हणजे ती त्या दिशेने जाणाऱ्या ट्रकला लिफ्ट मागायची.

मनात भिती आणि संकोच होता, पण तिच्याकडे पर्याय नव्हता. काही दिवसानंतर तिला ट्रक ड्रायव्हर ओळखू लागले होते. त्यामुळे जसे मीराबाईचे घर जवळ यायचे ते हॉर्न वाजवायचे. त्यामुळे तिला वेळात प्रशिक्षण केंद्रापर्यंत पोहचता यायचे.

काही दिवसानंतर ट्रक ड्रायव्हर आणि मीराबाई यांच्यामध्ये चांगलीच ओळख झाली होती. त्यामुळे मीराबाईलाही प्रशिक्षण केंद्रात जाणे सोपे झाले होते. विशेष म्हणजे त्या चालकांना कधीच मीराबाईकडून पैसे घेतले नव्हते. त्यामुळे मीराबाईला त्या पैशातून प्रशिक्षणादरम्यान खाद्यपदार्थ विकत घेता यायचे.

महत्वाच्या बातम्या-

तारक मेहता…’मधील ‘ही’ प्रसिद्धी अभिनेत्री करणार बिग बॉसमध्ये धमाकेदार एंट्री
मनोज बाजपेयीचा अभिनय पाहून २ सिनियर अभिनेत्रींनी पडल्या होत्या त्याच्या पाया; नाव वाचून हैराण व्हाल
१९९८ मध्ये घटस्फोटासाठी केला होता अर्ज, तब्बल २१ वर्षांनी कोर्टाचा निर्णय पाहून दाम्पत्य झाले हैराण

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.