मोठी बातमी! संपत्तीसाठी भावांकडून माजी मंत्री विजय शिवतारेंचा छळ, मुलीच्या आरोपाने खळबळ

पुणे । शिवसेना नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांची कन्या आणि आई-भाऊ यांच्यात वाद निर्माण झाल्याचे समोर आले आहे. शिवतारे यांच्या कन्या यांनी याबाबत माहिती दिली आहे. त्या म्हणाल्या माझ्या पित्याची माझ्याच भावांनी संपत्तीच्या लोभापायी केलेली दयनीय अवस्था पाहून आज मी अत्यंत अस्वस्थ आहे.

ममता शिवतारे लांडे यांनी वडिलांच्या फेसबुक अकाऊण्टवरुन आरोप केला आहे. त्या म्हणाल्या, मी ममता शिवदीप लांडे-शिवतारे, आजवर आपण बापूंच्या राजकीय कारकीर्दीत क्वचितच मला पाहिले असेल. मग आज मी बोलत आहे तर नक्कीच त्यामागे एक मोठ कारण आहे.

बापूंसारखे मला त्यांनी फुलासारखे जपले. माझी प्रत्येक जबाबदारी अतिशय खंबीरपणे पार पाडली. मला अपार प्रेम दिले. माझ्या आयुष्यात त्यांना देवापेक्षाही वरचे स्थान आहे. अश्या माझ्या पित्याची माझ्याच भावांनी संपत्तीच्या लोभापायी केलेली दयनीय अवस्था पाहून आज मी अत्यंत अस्वस्थ आहे.

गंभीर प्रकृती असताना त्यांची बायपास झाले हे आपणा सर्वांना माहीतच आहे. डॉक्टरांनी त्यांच्या वाचण्याची शक्यता २० टक्के आहे असे सांगितले. माझा भक्कम असा आधारस्तंभ ढासळतो की काय या भीतीने माझी झोपच उडाली होती. ऑपरेशन यशस्वी झाले, मात्र त्यानंतरही जीवाला धोका असताना माझा मोठा भाऊ सतत धमक्या देऊन मानसिक त्रास देत होता.

किडनीच्या आजारामुळे बाबा एक दिवसाआड डायलीसिसला जातात. या दीड वर्षात एकदाही माझ्या दोन्ही भावांपैकी कोणीही त्यांना भेटायला सुद्धा आले नाही. ते आहेत की नाही? त्यांची प्रकृती नाजूक असल्याने मानसिक दबाव अजून वाढवून, त्यांना कमकुवत करण्याचे प्रयत्न सुरु झाले. असा आरोप ममता यांनी केला आहे.

तर ममता यांचे आरोप त्यांच्याच मातोश्रींनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून खोडून काढले. यामुळे मात्र एकच खळबळ उडाली आहे. शिवतारे हे शिवसेनेचे मोठे नेते आहेत.

ताज्या बातम्या

अजय देवगणने खरेदी केला अलिशान बंगला, पण बंगला खरेदीसाठी घेतले तब्बल ‘इतक्या’ कोटींचे कर्ज

तुम्हाला माहिती आहे का? भारतात ‘या’ नोकऱ्यांमध्ये मिळतो लाखो रुपये पगार, आकडा वाचून अवाक व्हाल

बॉलीवूडमध्ये काम करण्यासाठी रिमा लागूने सोडली होती बॅंकेतील नोकरी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.