Share

राज्यातील मंत्र्यांचा अजब कारभार! खाजगी रुग्णालयात घेतले उपचार, बिलांची वसुली मात्र सरकारी तिजोरीतून

महाराष्ट्राच्या राजकारणातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. महाविकास आघाडी सरकारमधील १७ मंत्र्यांनी कोरोना काळात खाजगी रुग्णालयात उपचार घेतले होते. राज्य सरकारमधील मंत्र्यांनी या उपचाराची लाखोंची बिले सरकारी तिजोरीतून भरल्याचे समोर आले आहे. या मंत्र्यांमध्ये आरोग्यमंत्री राजेश टोपे(Rajesh Tope) यांचा देखील समावेश आहे.(minister take treatment in private hospital and pay bill from government Vault)

कोरोना काळात एकूण १७ मंत्र्यांनी खाजगी रुग्णालयात उपचार घेतले आहेत. या उपचारासाठी लाखो रुपयांचा खर्च झाला आहे. हा सर्व खर्च सरकारी तिजोरीतून घेण्यात आला आहे. या १७ मंत्र्यांमध्ये सर्वात जास्त मंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ९ मंत्र्यांनी खाजगी रुग्णालयातील उपचारासाठी लागणारे पैसे सरकारी तिजोरीतून खर्च केले आहेत.

यामध्ये काँग्रेसचे ६ तर शिवसेनेचे ३ मंत्री आहेत. या मंत्र्यांमध्ये आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचं देखील नाव आहे. राजेश टोपे यांच्या उपचाराचं बिल तब्बल ३४ लाख रुपये झालं आहे. तसेच महाविकास आघाडी सरकारमधील ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचं बिल सुमारे १७ लाख ६३ हजार रुपये झालं आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपचारचं बिल १४ लाख ५६ हजार रुपये झालं आहे.

महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या उपचारासाठी १२ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. तर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या उपचारांचे बिल ११ लाख ७६ हजार रुपये झालं आहे. राज्य सरकारमधील अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या उपचारासाठी ९ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत.

यामध्ये जलसंपदा मंत्री जयंत पाटील, उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि परिवहन मंत्री अनिल परब यांचा देखील समावेश आहे. या मंत्र्यांनी कोरोना काळात खाजगी रुग्णालयात उपचार घेतले होते. त्यांच्या उपचारांसाठी लागणारे लाखो रुपये सरकारी तिजोरीतून खर्च करण्यात आले आहेत. एका वृत्तवाहिनीने यासंदर्भात माहिती दिली आहे.

तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दोन लाखांपर्यंत उपचार घेतले आहेत. तर अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी ५० हजारांच्या आसपास उपचार घेतले आहेत. या १७ मंत्र्यांनी फोर्टिस हॉस्पिटल, आधार हॉस्पिटल, अवंती हॉस्पिटल, ग्लोबल हॉस्पिटल, केईएम हॉस्पिटल, ब्रीच कँडी हॉस्पिटल, लीलावती हॉस्पिटल आणि जसलोक हॉस्पिटल या ठिकाणी उपचार घेतल्याची माहिती समोर आली आहे.

महत्वाच्या बातम्या :-
पुण्यात हिंदू मुस्लिम बांधवांनी एकमेकांना खजूर अन् मोदक भरवत एकत्र सोडला रोजा अन् उपवास
आधी कार अपघातात मुलीला गमावलं, आता माजी क्रिकेटपटूची मृत्यूशी झुंज; मदतीचे आवाहन
शाहरूख-अमीरला टक्कर देणाऱ्या ‘या’ अभिनेत्यावर आलीये वाईट वेळ, ओळखनेही झालंय कठीण

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now