पुजा चव्हाणच्या मृत्यूचं घाणेरडं राजकारण केलं जातय – संजय राठोड

यवतमाळ | अनेक दिवसांपासून पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरुन राजकारण चांगलेच तापले आहे. याबाबत मंत्री संजय राठोड यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. यावेळी त्यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप करणाऱ्या विरोधकांवर निशाणा साधला आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना संजय राठोड म्हणाले, पुजाच्या मृत्यूवरून घाणेरडं राजकारण केलं जात आहे. याप्रकरणी गेल्या अनेक दिवसांपासून माझी बदनामी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मी भटक्या विमुक्त समाजातून, ओबीसी समाजाच नेतृत्व करणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळे माझ्यावर आरोप लावून माझं सामाजिक आणि राजकीय जीवन संपवण्यासाठी षडयंत्र केले गेले आहे.

दरम्यान संजय राठोड यांच्यावर पुजा चव्हाण आत्महत्येचे गंभीर आरोप लागले.  यानंतर तब्बल १५ दिवसांनी मंत्री राठोड यांनी मौन सोडले आहे. यावेळी ते म्हणाले, पुजा चव्हाण या आमच्या बंजारा समाजातील तरुणीच्या मृत्यूने संपुर्ण समाजाला दुख: झाले आहे. याचे आम्हालाही दु:ख आहे आम्ही त्यांच्या चव्हाण कुटुंबीयांच्या सोबत आहोत.

तसेच, सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटोबद्दल बोलताना मंत्री संजय राठोड म्हणाले, अनेक लोक माझ्यासोबत फोटो काढतात. गेली ३० वर्षे सामाजिक राजकीय जीवनात काम केले आहे.  एका घटनेमुळे मला राँग बॉक्समध्ये उभं करु नका असे संजय राठोड यांनी म्हटले आहे.

याशिवाय पुढे बोलताना राठोड म्हणाले, मी विश्वासाने सांगतोय मुख्यमंत्र्यांनी लावलेल्या तपासात सर्व गोष्टी समोर येतील. तर अरुण राठोवर बोलण्यास संजय रोठोड यांनी नकार दिला आहे.

दरम्यान राठोड यांच्या पत्रकार परिषदेनंतर भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी पुजा चव्हाणच्या आत्महत्येला मंत्री संजय राठोडचं जबाबदार असल्याचं म्हटलं आहे.

चित्रा वाघ म्हणाल्या की, “पुजाच्या आत्महत्येनंतर व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमधील आवाज संजय राठोड यांचाच आहे. महाविकास आघाडी सरकारमधील नेते संजय राठोड यांना पाठिशी घालण्याचं काम करत आहे संजय राठोड हाच पुजा चव्हाणचा हत्यारा आहे”.

महत्वाच्या बातम्या-
केक आणि बरंच काही! पूजा चव्हाण-संजय राठोडांच्या नव्या फोटोंनी राजकीय वर्तुळात उडाली खळबळ
पुजाला यवतमाळला मारलं अन् पुण्यात आणून इमारतीवरून फेकलं; नातेवाईकांचा गंभीर आरोप
पुजा चव्हाणसोबतच्या ‘त्या’ फोटोबद्दल संजय राठोडांनी दिले धक्कादायक स्पष्टीकरण
मंत्री संजय राठोडांना पत्नीची खंबीर साथ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.