महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींनी लोकांना अडचणीत असताना मदत केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. अशीच एक घटना बीड जिल्ह्यातून समोर आली आहे. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी एका अपघातग्रस्त तरुणाचे प्राण वाचवले आहेत. यामुळे सध्या सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे(Dhanjay Munde) यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.(minister dhanjay munde save life of young man)
मिळालेल्या माहितीनुसार, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आपल्या शासकीय बैठका पूर्ण करून बीडहून परळीला निघाले होते. त्यावेळी सिरसाळा ते पांगरी मार्गादरम्यान एक तरुण दुचाकीस्वार अपघातग्रस्त होऊन गंभीर जखमी झाला होता. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचा ताफा या मार्गावरून जात असताना त्यांना एक तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला.
हे दृश्य पाहताच सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी त्यांचा ताफा थांबवला आणि अपघातग्रस्त तरुणाकडे धाव घेतली. त्यावेळी अपघातग्रस्त तरुणाच्या डोक्याला जबर दुखापत झाली होती. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी तरुण शुद्धीत आहे का? याची खात्री केली. तसेच आपल्या स्वीय सहाय्यकांना रुग्णवाहिका बोलावण्यासाठी फोन लावण्यास सांगितला आणि धनंजय मुंडे यांनी स्वतः संवाद साधला.
त्यानंतर काही वेळात रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. तसेच पोलीस देखील तातडीने हजर झाले. त्यानंतर सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी अपघातग्रस्त तरुणाला आंबेजोगाई येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले. तसेच रुग्णालय प्रशासनाला तरुणावर तातडीने उपचार करण्याबाबत सूचना देखील दिल्या.
काही वेळाने धनंजय मुंडे यांनी अपघातग्रस्त तरुणाच्या कुटूंबियांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचा ताफा पुन्हा परळीकडे निघाला. वाटेत धनंजय मुंडे यांनी अपघातग्रस्त तरुणाच्या कुटूंबियांची भेट घेतली व त्यांना धीर दिला. ताई काळजी करू नका, अंबेजोगाईला सावकाश जा, तो बरा आहे. मी आताच त्याच्याशी बोललो, असे धनंजय मुंडे यांनी अपघातग्रस्त तरुणाच्या कुटूंबियांना सांगितले.
तसेच कुटूंबियांना लवकर अंबेजोगाईला पोहचता यावे, यासाठी वाहनांची व्यवस्था देखील केली. या घटनेचे काही व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेक युजर्सनी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचे कौतुक केले आहे. यापूर्वी देखील लोकप्रतिनिधींनी अपघातग्रस्त व्यक्तींना मदत केली आहे.
महत्वाच्या बातम्या :-
आज ३ तारीख, उद्यापासून गोंगाट बंद होईल अशी अपेक्षा बाळगते, प्राजक्ता माळीची पोस्ट चर्चेत
“शिवरायांची समाधी लोकमान्य टिळक यांच्याकडून बांधली गेली नाही”, संभाजीराजे छत्रपतींनी केला खुलासा
राज ठाकरेंच्या भाषणावर औरंगाबाद पोलीस आयुक्त आजच कारवाई करणार; पोलीस महासंचालकांची माहिती