Share

भर बैठकीतच भरणे अन् राऊतांमध्ये जुंपली; आधी खाली बसा म्हणत राष्ट्रवादीच्या भरणेंनी राऊतांना झापले

सोलापूरमध्ये पालकमंत्री आणि आमदारामध्ये वाद रंगला आहे. सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे(Dattatray Bharne) आणि बार्शीचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांच्यामध्ये जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत खडाजंगी पाहायला मिळाली. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी बार्शीचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांना खडसावले आहे. यामुळे काही काळ बैठकीमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. (minister dataray bharne and mla rajendra raut fight)

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सोलापूरमध्ये जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला जिल्ह्यातील सर्व आमदार हजर होते. यावेळी बैठकीमध्ये जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागातील रस्त्यांच्या कामांच्या विषयावर चर्चा झाली. ठेकेदारांना प्रशासनातील अधिकारी पाठीशी घालत आहेत, असा आरोप आमदारांनी केला आहे.

यावेळी हा विषय जिल्हा नियोजन समितीचा आहे का? असा प्रश्न पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी बार्शीचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांना विचारला. त्यावर अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांनी ‘हो’ असे उत्तर दिले. यावेळी बार्शीचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत म्हणाले की, “जिल्हा नियोजनात रस्ता विषय येत नाही का?, हा विषय जिल्हा नियोजनाचा आहे आणि तुमच्याकडे असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाशी निगडित आहे”, असे आमदार राजेंद्र राऊत यांनी सांगितले.

त्यावर पालकमंत्री दत्तात्रय भरणे संतापले आणि खुर्चीतून उभे राहिले. “तुम्ही आधी खाली बसा आणि मग विषय मांडा”, अशा शब्दांत पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांना सांगितले. यावरून पालकमंत्री दत्तात्रय भरणे आणि बार्शीचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांच्यामध्ये जोरदार वाद झाला.

यावेळी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी वेळेत काम न करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. मंजूर केलेले काम वेळेत पूर्ण करणाऱ्या ठेकेदारांनीच कामे घ्यायला पाहिजेत. अनेक ठेकेदार काम मंजूर करून देखील कामे करत नाहीत. त्यांच्यावर तातडीने कारवाई करा”, असे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सांगितले.

महत्वाच्या बातम्या :-
पवारांवर आक्षेपार्ह पोस्ट लिहीणाऱ्या तरूणाला अटक केल्याने मुंबई पोलिसांना हायकोर्टाने झापले; जाणून घ्या पुर्ण प्रकरण
‘असं करून तुम्ही पवारांची प्रतिष्ठा कमी करताय’, हायकोर्टाने मुंबई पोलिसांना झापले; वाचा नेमकं प्रकरण काय..
सुशांतच्या पुण्यतिथीला भावूक झाली बहिण, ‘तो’ फोटो शेअर करत म्हणाली, भावा, तु जगाला…

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now