सलाम! सफाई कर्मचाऱ्यांची वाट न बघता मंत्र्याने स्वत:च्या हाताने पुसली कोरोना वार्डाची फरशी

मिझोरम | कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात हाहाकार माजवला आहे. कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासन कडक पावले उचलत आहे. कोरोना काळात अनेकांनी मदतीसाठी हात पुढे केला आहे.

राजकीय नेते, उद्योजक, कलाकार, खेळाडूंनी कोरोना रुग्णांसाठी निधी दिला आहे. रुग्णांसाठी दिवसरात्र काम करणाऱ्या कलाकारांना, नेत्यांना, खेळाडूंनाही कोरोनाने ग्रासले आहे. यातून बरे होऊन ते पुन्हा रुग्णांची मदत करत आहेत.

मिझोरमचे ऊर्जा मंत्री आर. लालझिरलियाना यांना कोरोनाची लागण झाली होती. रुग्णालयात उपचार घेत असतानाही लालझिरलियाना यांनी आपल्या कामाने एक वेगळीच छाप पाडली आहे. ज्या रुग्णालयात मंत्री लालझिरलियाना भरती होते  त्या रुग्णालयाची फरशी स्वत:च्या हाताने त्यांनी पुसली आहे.

ऊर्जा मंत्री आर. लालझिरलियाना यांच्यासह त्यांच्या मुलाला आणि पत्नीला कोरोनाची लागण झाली होती. लालझिरलियाना यांची ऑक्सिजन पातळी कमी होत होती. रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली.

लालझिरलियाना जोरम मेडिकल कॉलेजमध्ये उपचार घेत होते. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याने त्यांना  कोविड वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आले. यावेळी त्यांना ज्या वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आले होते. त्या वॉर्डमध्ये अस्वच्छता असल्याचं दिसलं.

लालझिरलियाना यांनी सफाई कर्मचाऱ्यांना याची माहिती दिली. बराच वेळ झालं तरीही कुणीही साफसफाई करण्यास न आल्याने लालाझिरलियाना यांनी स्वत:च वॉर्ड स्वच्छ करायचं ठरवलं. आणि त्यांनी कोविड वॉर्डमधील फरशी स्वत:च्या हाताने पुसण्यास सुरूवात केली. सोशल मिडियावर आर. लालझिरलियाना यांचे फरशी पुसतानाचे फोटो व्हायरल झाले आहेत.

एका स्थानिक वृत्तवाहिनीशी बोलताना ऊर्जा मंत्री आर. लालझिरलियाना म्हणाले, माझा सफाई कर्मचाऱ्यांना, डॉक्टरांना दु:खवण्याचा हेतू  नाही. झाडू मारणे, फरशी पुसणे हे काम माझ्यासाठी नवीन नाही. मी माझ्या घरी देखील ही कामे करतो. मंत्री असलो तरीही मी  इतरांपेक्षा वेगळा नाही.

ऊर्जा मंत्री असूनही लालझिरलियाना यांनी कामाची लाज बाळगली नाही. यावरून अनेकांनी त्यांचे कौतूक केलं आहे. लालझिरलियाना हे एक चांगले नेते असल्याचं सोशल मिडिया युजर्सने म्हटलं आहे. लालझिरलियाना यांनी  जनतेचे मन जिंकले आहे.

महत्वाच्या बातम्या-
देशातील सर्वात लहान कोरोना योद्धा; १० दिवस व्हेंटिलेटरवर राहून हरवले कोरोनाला
पैसा नाही मोठं मन पायजे! भाजी विकून पोट भरणाऱ्या आजीने मुख्यमंत्री निधीला केली लाखाची मदत
ही दोस्ती तुटायची नाय! मित्राच्या उपचारासाठी दोघा मित्रांनी दोन दिवसात जमा केले ३० लाख

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.