ठाकरे सरकारमधून काँग्रेस बाहेर पडण्याच्या तयारीत, विश्वासात घेतले जात नसल्याचा मंत्र्याचा आरोप

मुंबई । ठाकरे सरकारच्या अडचणीत सध्या वाढ झाली आहे. सरकारने काढलेल्या एका जीआरमुळे आता सरकार पुढील अडचणीत वाढ झाली आहे. न्यायालयाचे कारण देऊन राज्य सरकारने शासकीय सेवेतील पदोन्नतीतील आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी काँग्रेसला विश्वासात घेतले गेले नसल्याचे काँग्रेसकडून सांगितले जात आहे.

यामध्ये शासकीय सेवेत केवळ सेवाज्येष्ठतेनुसार आरक्षण दिले जाईल असे त्या जीआरमध्ये म्हटले आहे. हा जीआर निघाल्यानंतर काँग्रेसचे मंत्री नितीन राऊत यांनी आक्रमक भूमिका घेतली. या न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर काय भूमिका घेयची यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली उपसमिती नेमली आहे.

या उपसमितीत नितीन राऊत देखील आहेत. ते समितीत असताना देखील आरक्षण रद्द करण्याचा जीआर काढताना त्याबाबत उपसमितीला आणि काँग्रेसलाही विश्वासात घेतले नाही, असा आरोप त्यांनी केला आहे.

यावरून आता राजकीय वातावरण तापले आहे. यामुळे आता काँग्रेस सरकारमधून बाहेर पडण्याच्या तयारीत आहे. पदोन्नतीतील आरक्षण रद्द करण्याचा जीआर मागे घेतला नाही तर काँग्रेसने ही टोकाची भूमिका घेण्याचे ठरवले असल्याचे काँग्रेसमधील वरिष्ठ सूत्रांचे म्हणने आहे.

आता यावर मुख्यमंत्री काय भूमिका घेतात त्यावर ठाकरे सरकारचे सर्व गणित अवलंबून असल्याचे सांगितले जात आहे. मात्र यामुळे काँग्रेस चांगलीच आक्रमक झाल्याचे बोलले जात आहे. आता मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेणार आहेत.

यावेळी अजित पवार आणि नितीन राऊत यांच्यामध्ये बाचाबाची झाल्याचे देखील बोलले जात आहे. यामुळे नितीन राऊत यांचा राग हा अजित पवार यांच्यावर असल्याचे सांगितले जात आहे.

ताज्या बातम्या

देवा, घड्याळाचे काटे पुन्हा उलटे फिरव; वडिलांच्या आठवणीत रितेश देशमुख भावूक

व्हाट्स अँपने भारत सरकारच्या विरोधात ठोठावला न्यायालयाचा दरवाजा; घ्या अधिक जाणून

…म्हणून सावत्र बहीणींच्या लग्नाला गेले नव्हते सनी आणि बॉबी देओल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.