फोटो जळताना पाहून मीना हॅरीस संतापल्या; म्हणाल्या “जर आम्ही भारतात राहत असतो तर….’’

भारतात केंद्र सरकाविरोधात दोन महिन्यांपासून शेतकरी आंदोलन करत आहेत. त्यांना देशातील आणि देशाबाहेरील मोठ्या व्यक्तींचा पाठिंबा मिळत आहे. पॉप स्टार रिहानाने केलेल्या एका ट्विटनंतर अनेक आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरीस यांची भाची मीना हॅरिस यांनीही शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता.

मीना हॅरीस यांनी ट्विट करत म्हटलं होतं की, ‘जगातील सर्वात मोठी लोकशाही धोक्यात आली आहे’. शेतकऱ्यांचं समर्थन केल्यामुळे भारतात काही संघटनांकडून भारतातील विषयात हस्तक्षेप करू नये असं म्हणतं त्यांचे फोटो जाळण्यात आले होते. फोटो जळताना पाहून मीना हॅरीस संतप्त झाल्या आहेत.

भारतातल्या विषयात तोंड घालू नये असं म्हणाऱ्यांना त्यांनी खडेबोल सूनावले आहेत. त्या म्हणाल्या की, “स्वत:चा जळलेला फोटो पाहणे विचित्र आहे परंतू आपण भारतात राहिलो तर काय करतील याची कल्पना करा. मी तुम्हाला सांगते की, 23 वर्षीय कामगार हक्क कार्यकर्त्या नवदीप कौरला अटक करण्यात आली होती. पोलिस कोठडीत छळ व लैगिक अत्याचार करण्यात आले. जामिन न देता २० दिवसांपासून तुरूंगात ठेवलं आहे”.

 

 

पुढे म्हटले की, हे केवळ कृषी धोरणाबद्दल नाही. हे धार्मिक अल्पसंख्यांकाच्या छळाबद्दल देखील आहे. ही पोलिस हिंसा अतिरेकी राष्ट्रवाद आणि कामगार हक्कांवर हल्ले आहे. ही जागतिक हुकूमशाही आहे. मला तुमच्या कारभारापासून दूर राहण्यास सांगू नका. हे आमचे सर्व मुद्दे आहेत. असं त्यांनी ट्विट करत म्हटलं आहे.

म्हत्वाच्या बातम्या-
..त्यामुळे “मला भारतरत्न देण्याच्या मागणीची मोहीम थांबवा’’ रतन टाटांचे भावनिक आवाहन
शरद पवारांचा सचिन तेंडुलकरला सल्ला; “आपलं क्षेत्र सोडून इतर विषयांवर बोलताना…”
संभाजी ब्रिगेड सचिनविरोधात आक्रमक; भारतरत्न काढून घेण्याची केली मागणी
महाराष्ट्राला लुबाडणाऱ्या मोदी सरकारची रोहित पवारांनी थेट पुरावे देत केली पोलखोल

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.