Share

MIM च्या नेत्यांनी कबूल करावं की औरंगजेब त्यांचा बाप आहे, शिवसेनेची जहरी टीका

औरंगाबाद नामांतराला एमआयएम पक्षाने विरोध दर्शवला आहे. औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर करण्यात यावे, असा निर्णय काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडी सरकारने घेतला होता. एमआयएम पक्षाचे खासदार इम्तियाज जलील यांनी या निर्णयाला विरोध केला होता. आज औरंगाबादमध्ये(Aurangabad) नामांतराला विरोध करण्यासाठी एमआयएम पक्षाकडून मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.(MIM leaders should admit that Aurangzeb is their father, Shiv Sena’s  criticism)

यावरून शिवसेना नेते आणि आमदार अंबादास दानवे यांनी एमआयएम पक्षातील नेत्यांवर हल्लाबोल केला आहे. “एमआयएम पक्षाच्या नेत्यांनी कबूल करावं की औरंगजेब त्यांचा बाप होता”, अशी घणाघाती टीका शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी केली आहे. शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

यावेळी शिवसेना आमदार अंबादास दानवे म्हणाले की, “औरंगजेब आक्रमक होता. त्याने सत्तेसाठी आपल्या वडिलांना कैद केले होते. त्याने मंदिरे लुटली. लोकांचा छळ केला. पण एमआयएम संघटना नेहमीच औरंगजेबाच्या कबरीवर लोटांगण घालत असते. त्यामुळे त्यांनी हे तरी कबूल केलं पाहिजे की औरंगजेब त्यांचा बाप होता, आजोबा होता किंवा पणजोबा होता”, असे आमदार अंबादास दानवे यांनी सांगितले.

“आम्ही अभिमानाने म्हणतो की बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर केले आहे”, असे शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. शिवसेना आमदार अंबादास दानवे पुढे म्हणाले की, “औरंगाबाद शहरातील महानगर पालिकेच्या निवडणूक डोळ्यासमोर ठेवून एमआयएम पक्ष रणनीती आखत आहे.”

“मुस्लिम मतांसाठी हे प्रयत्न सुरु आहेत. शिवसेनेने यापूर्वी देखील औरंगाबाद की संभाजीनगर या मुद्द्यावर निवडणूक लढवली आहे. यामध्ये जनतेने नेहमीच संभाजीनगरला विजयी केले आहे. जनमताचा कौल संभाजीनगरच्या बाजूने आहे. शिवसेना जशास तसे उत्तर द्यायला तयार आहे. पण एमआयएम पक्षाला औरंगजेबाचा इतका पुळका का? असा प्रश्न शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी उपस्थित केला आहे.

औरंगाबादच्या नामांतराला विरोध करण्यासाठी एमआयएम पक्षाकडून शहरात मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाच्या अनुषंगाने औरंगाबाद शहरात मोठया प्रमाणात पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. एमआयएम पक्षाचे खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबाद नामांतराच्या निर्णयाला विरोध करत एक ट्विट केलं होतं. “माझ्या जन्म दाखल्यावर औरंगाबाद आहे, तर मृत्यू दाखल्यावर औरंगाबादच हवे”, अशा आशयाचं ट्विट इम्तियाज जलील यांनी केलं होतं.

महत्वाच्या बातम्या :-
आर्थिक विकासाची गंगा आणणाऱ्या मुंबईची आदित्यसेनेने गटारगंगा केली, नितेश राणेंची बोचरी टीका
‘शिवसेनेचा पाठिंबा हवा असल्यास भाजपने मातोश्रीवर यायला हवे’, उद्धव ठाकरेंची अपेक्षा
मोठी बातमी! शिवसेना भाजपला देणार पाठिंबा? उद्धव ठाकरेंनी भाजपसमोर ठेवली ‘ही’ अट

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now