एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी(Assudin Owesi) यांनी हिजाबच्या मुद्द्यावरून पाकिस्तानला सुनावलं आहे. आमच्या घरच्या प्रश्नात पाकिस्तानने(Pakistan) नाक खुपसू नये. आपल्या देशात काय चाललयं ते पहा, असा सल्ला असदुद्दीन ओवेसी यांनी पाकिस्तानला दिला आहे. पाकिस्तानने भारताच्या प्रकरणात ढवळाढवळ करू नये, असे एमआयएम खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी सांगितले आहे.(mim assudin owesi statement to pakisatn)
एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी म्हणाले की, “आमच्या घरच्या प्रश्नात पाकिस्तानने नाक खुपसू नये. मलाला युसूफझाईवर(Malala Uausfuzai) झालेला हल्ला पाकिस्तानात झाला होता. पाकिस्तानच्या घटनेनुसार कोणताही बिगर मुस्लिम पाकिस्तानचा पंतप्रधान होऊ शकत नाही.” खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी कर्नाटकमधील हिजाबच्या मुद्द्यावरून पाकिस्तानला झापले आहे.
खासदार असदुद्दीन ओवेसी पुढे म्हणाले की, “मला पाकिस्तानच्या लोकांना सांगायचे आहे की तुम्ही आमच्या देशातील प्रश्नाकडे पाहू नका, तुमच्या देशाकडे लक्ष द्या. तुमची बलुचिस्तानशी कोणती भांडणे आहेत हेच कळत नाही. हा देश माझा आहे, आमच्या घरातील गोष्ट आहे. त्यात आपले नाक खुपसू नका. अन्यथा तुम्हाला दुखापत होईल.”
एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी म्हणाले की, “आम्हाला हिजाब आणि बुरख्यावर अधिकार नाही. आमचा मूलभूत अधिकार संविधानावर आहे. आम्ही काय घालतो आणि काय खातो, हे पाहण्याची गरज नाही. माझी मुलगी, आई, बायको आणि खाला काय परिधान करतील, हा तुमचा प्रश्न नाही. तुम्ही तुमच्या घराकडे लक्ष द्या.”
यापूर्वी खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी कर्नाटकातील हिजाब प्रकरणावर ट्विट केले होते. “मंड्या पीईएस कॉलेज कर्नाटकातील धाडसी हिजाबी मुलगी ‘बीबी मुस्कान’ हिने हिंदुत्वाच्या कार्यकर्त्यांशी धैर्याने लढा दिला. मी मुस्कान आणि त्याच्या सासऱ्यांशी बोललो आणि मुस्कानच्या धाडसाचं कौतुक केलं, तिला प्रोत्साहन दिलं आणि म्हटलं की मुस्कान तुझा उत्साह पाहून आम्हालाही प्रोत्साहन मिळालं.”
हिजाब प्रकरणावर नोबेल शांतता पारितोषिक विजेता मलाला युसूफझाई यांनी देखील ट्विट केलं होत. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, “हिजाब परिधान केलेल्या मुलींना शाळेत प्रवेश करण्यापासून रोखणे हे भयानक आहे. महिलांना कमी-अधिक प्रमाणात कपडे घालण्यास हरकत आहे. भारतीय नेत्यांनी मुस्लिम महिलांना दुर्लक्षित करणे थांबवावे.” मलालाच नाही तर पाकिस्तानातून हिजाबबाबत मोठ्या प्रमाणात ट्विट केले जात आहेत.
हिजाबबद्दलचे हे संपूर्ण प्रकरण कर्नाटकातील आहे. कर्नाटकमधील काही मुलींनी आरोप केला की त्यांना हिजाब परिधान केल्यामुळे कॅम्पस आणि वर्गात प्रवेश दिला जात नाही. कर्नाटकातील उडुपी येथील सरकारी प्री-युनिव्हर्सिटी वुमेन्स कॉलेजमध्ये गेल्या महिन्यात हिजाबच्या विरोधात आंदोलन सुरू झाले. हिजाब परिधान केल्यामुळे त्यांना वर्गात प्रवेश नाकारण्यात आल्याचा आरोप महाविद्यालयातील सहा विद्यार्थिनींनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या :-
महिंद्रा थार खरेदी करण्याची सुवर्णसंधी, फक्त ६९१ रुपयांत घरात आणा नवी कोरी कार
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून राजकारण तापलं, आयुक्तांच्या अंगावर फेकली शाई
लतादीदींचं ‘ते’ अखेरचं स्वप्न होणार पूर्ण; ठाकरे सरकारने घेतला मोठा निर्णय