सध्या ज्ञानवापी मशीद आणि कुतुब मिनार प्रकरणाची जोरदार चर्चा आहे. या प्रकरणांची सध्या न्यायालयात सुनावणी सुरु आहे. यावेळी ज्ञानवापी मशीद आणि कुतुब मिनार प्रकरणामध्ये दोन्ही पक्षांकडून दावे-प्रतिदावे करण्यात येत आहे. यादरम्यान एमआयएम (MIM) पक्षाचे प्रमुख नेते असउद्दीन ओवेसी यांनी हिंदू पक्षकारांना एक सवाल विचारला आहे.(MIM assudin owesi statement on dyanvapi masjid and kutubminar conterversy)
मुघलांशी भारतीय मुसलमानांचा काहीही संबंध नाही, पण मुघलांच्या बायका कोण होत्या? असा प्रश्न एमआयएम पक्षाचे प्रमुख नेते असउद्दीन ओवेसी यांनी उपस्थित केला आहे. सध्या ज्ञानवापी मशीद आणि कुतुब मिनार प्रकरणात वाद सुरु आहे. या वादावर भाष्य करता असताना असउद्दीन ओवेसी यांनी हे विधान केलं आहे.
एमआयएम पक्षाचे प्रमुख नेते असउद्दीन ओवेसी यांनी फेसबुकवर यासंदर्भात एक पोस्ट केली आहे. त्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले आहे की, “मुघल आणि भारतीय मुसलमान यांचा काहीही संबंध नाही, पण मला हे सांगा की मुघलांच्या बायका कोण होत्या?”, अशा आशयाची पोस्ट असउद्दीन ओवेसी यांनी फेसबुकवर केली आहे.
https://www.facebook.com/210058522394900/posts/5256980841035951/
यावेळी एमआयएम पक्षाचे प्रमुख नेते असउद्दीन ओवेसी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर देखील टीका केली आहे.”स्वाभिमान आणि सहानभूती यांसारख्या गोष्टी राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये शिकवल्या जात नाहीत. भारतीय मुसलमानांनी देशाच्या प्रगतीत मोलाचे योगदान दिले आहे आणि यापुढे देखील भारतीय मुसलमान आपले योगदान देत राहतील”, असे एमआयएम पक्षाचे प्रमुख नेते असउद्दीन ओवेसी म्हणाले आहेत.
काल दिल्लीतील न्यायालयात कुतुबमिनार प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली. या प्रकरणाचा निकाल ९ जून रोजी दिला जाणार आहे. तसेच ज्ञानवापी मशीद प्रकरणाची सुनावणी देखील काल वाराणसी जिल्हा न्यायालयात झाली. यावेळी न्यायालयाने दोन्ही पक्षांचा बाजू ऐकून घेतली. या प्रकरणाची पुढील सुनावणी २६ मे ला होणार आहे.
कुतुबमिनार प्रकरणात काल एसआय आणि हिंदू अशा दोन्ही पक्षांचा युक्तिवाद पूर्ण झाला. या सुनावणी दरम्यान न्यायालयाने हिंदू पक्षाला चांगलेच सुनावले आहे. २७ मंदिरे पाडून कुव्वत-उल-इस्लाम मशीद बांधण्यात आली आहे. त्यामुळे त्या ठिकाणी हिंदूंना पूजा करण्याचा अधिकार मिळायला हवा, अशी मागणी हिंदू पक्षाने न्यायालयाकडे केली होती. त्यावर जर देवता त्या ठिकाणी ८०० वर्षे पूजा केल्याशिवाय राहत असतील तर त्यांना असेच राहू दिले जाऊ शकते, असे न्यायालयाने उत्तर दिले आहे.
महत्वाच्या बातम्या :-
मोठी बातमी! किर्तनकार इंदूरीकर महाराजांची प्रकृती बिघडली; किर्तनाचे सर्व कार्यक्रम रद्द
ज्ञानवापी प्रकरण : शरद पवारांचं मोठं विधान; वाचा काय काय म्हणाले…
‘या’ ठिकाणी मुलगी मोठी झाल्यावर बापाचे तिच्यासोबत लावून दिले जाते लग्न, वाचा विचित्र प्रथेबद्दल..





