एमआयएम(MIM) पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी(Assudin Owesi) यांच्या गाडीवर गुरुवारी उत्तर प्रदेशातील( Uttar Pradesh) हापूरमध्ये दोन हल्लेखोरांनी गोळीबार केला होता. असदुद्दीन ओवेसी पिलखुवा छिजारसी येथून निवडणूक रॅलीला संबोधित करून परतत होते. त्यावेळी टोल( Toll) टॅक्सजवळ हल्लेखोरांनी त्यांच्या ताफ्यावर गोळीबार सुरू केला. उत्तर प्रदेश पोलिसांनी तातडीने हल्लेखोरांना पकडले.(MIM assudin owesi attack aarested criminals says)
एमआयएम पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणात उत्तर प्रदेश पोलीस दोन्ही आरोपींची चौकशी करत आहेत. या दोन तरुणांनी असदुद्दीन ओवेसींच्या गाडीवर गोळीबार का केला, याबाबत उत्तर प्रदेश पोलिसांनी माहिती दिली आहे. यासंदर्भात उत्तर प्रदेश पोलिसांच्या वतीने वतीने एक निवेदन जारी करण्यात आले आहे.
उत्तर प्रदेश पोलिसांनी सांगितले आहे की, आतापर्यंत झालेल्या चौकशीत दोन्ही आरोपींनी खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी एका विशिष्ट धर्माविरोधात केलेल्या वक्तव्याचा राग आल्याचे सांगितले आहे. पोलीस अधिकारी प्रशांत कुमार यांनी सांगितले की, गुरुवारी ५. २० च्या सुमारास खासदार असदुद्दीन ओवेसी मेरठहून त्यांची बैठक संपवून परतत होते. त्यावेळी टोल टॅक्सजवळ त्यांच्या ताफ्यावर दोन तरुणांनी हल्ला केला.
पोलिसांनी या प्रकरणात तात्काळ कारवाई करून हल्लेखोरांना अटक केली आहे. टोलनाक्यावर बसवण्यात आलेल्या कॅमेऱ्यामध्ये या दोन हल्लेखोरांचे फोटो टिपण्यात आले. या फोटोंवरून हल्लेखोरांची ओळख पटवण्यात आली असून उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. दोन्ही आरोपी सध्या वकिलीचे शिक्षण घेत आहेत.
उत्तर प्रदेश पोलिसांनी सांगितले की, या घटनेत वापरलेली दोन्ही शस्त्रे सापडली आहेत. या घटनेची सध्या चौकशी सुरू आहे. या घटनेमध्ये हल्लेखोरांकडून वापरण्यात आलेली एक अल्टो कार जप्त करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशमध्ये कोणत्याही प्रकारचा गोंधळ होऊ दिला जाणार नाही. आरोपींवर योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन उत्तर प्रदेश पोलिसांनी दिले आहे.
या घटनेनंतर ओवेसी यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, त्यांचा ताफा पिलखुआ येथे पोहोचला तेव्हा मोठा आवाज झाला. त्यानंतर चालकाने गाडीवर गोळीबार झाल्याचे सांगितले. यानंतर पुन्हा तीन-चार वेळा गोळीबाराचा आवाज आला. आम्ही गाडी वेगाने पळवली, त्यादरम्यान आमच्या वाहनाच्या चालकाने हल्लेखोराला धडक दिली. हल्लेखोरांपैकी एकाने लाल रंगाचे जॅकेट घातले होते.
महत्वाच्या बातम्या :-
रश्मिका झाली oops moment ची शिकार, पाय वर करताच दिसले असे काही की.., पहा फोटो
मृतांचा आकडा लपवणाऱ्या चीनचा बुरखा फाटला, गलवान झटापटीत चीनचे ३८ सैनिक झाले होते ठार
मुलीच्या घटस्फोटानंतर रजनीकांत यांना बसला आणखी एक धक्का, अल्लु अर्जुन आहे कारण