१.९ मिलियन फॉलोअर्स, शिवमुद्रा तोंडपाठ, शेगावच्या चिमुकलीचे होतेय देशात कौतुक…

बुलढाणा । काही लहान मुलांच्या अंगात अनेक कलागुण असतात. यामुळे ते प्रसिद्ध होतात. त्यांचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. मुलांचा खोडकरपणा, त्यांचे लाडात बोलणे कदाचित या कारणांमुळे मुलांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

असे असताना मात्र बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव शहरातील ६ वर्षांच्या मुलीचे भन्नाट व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहेत. हे विडिओ सध्या सगळीकडे व्हायरल होत आहेत. यामुळे तिचे कौतुक केले जात आहे. कादंबरी ढमाळ असे या चिमुकलीचे नाव आहे.

कादंबरीचे जवळपास १. ९ मिलियन फॉलोअर्स आहेत. यामुळे येवढ्या कमी वयात हे फॉलोअर्स कसे वाढले, याबाबत अनेकांना उत्सुकता लागली आहे. इन्स्टाग्रामवर श्रद्धा शिंदे यांचे व्हिडीओ बघितल्यानंतर कादंबरीला ते आवडले आणि तिने तिच्या वडिलांकडे श्रद्धा शिंदे यांच्यासारखे व्हिडीओ बनवण्याचा हट्ट केला.

तेव्हापासून कादंबरीने व्हिडीओ बनवायला सुरुवात केली. आणि अल्पावधीतच तिने सगळीकडे नाव कमवले. तिने हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्याचे वर्णन करणाऱ्या अभिनय संपन्न व्हिडीओमुळे परिसरात ती घराघरात पोहोचली. शिवमुद्रा तोंडपाठ असल्याने तिचे कौतुक होत आहे.

नुकत्याच झालेल्या अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त कांदबरीने तयार केलेला व्हिडीओ सगळीकडे गाजला आहे. ‘टिंडा’ अँपवर कादंबरीचे १.९ मिलियन फॉलोअर्स तर इन्स्टाग्रामवर साडे चार हजार फॉलोअर्स आहेत. त्यामुळे ती आताच सोशल मीडियात स्टार झाली आहे.

कादंबरीच्या या कामगिरीवर देशभरातून कौतुक केले जात आहे. लहानपणापासून ती खूप हुशार आहे. भविष्यात देखील ती मोठे नाव कमवेल असा विश्वास अनेकांना आहे. महापुरुषांचे विचार ती सर्वांपर्यंत पोहोचवत आहे.

ताज्या बातम्या

४ वाघांनी घेरले पण एकाच्याही तावडीत नाही सापडला हा बदक, पाहा विडिओ

तुम्ही उडणारा खराखुरा ‘Harry Potter’ पाहिलाय का? नसेल पाहिला तर एकदा व्हिडिओ पहाच

लग्न झाल्या झाल्या नवरीने नवऱ्यासाठी केला भन्नाट डान्स, पाहून तुम्हालाही कौतुक वाटेल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.