‘हेच ते भाऊ जे नागडे धावले’, असं ट्रोल करणाऱ्याला मिलिंद सोमणचे भन्नाट उत्तर म्हणाला ‘जे नागडे…’

मिलिंद सोमण हे नाव सुपर मॉडेल आणि फिटनेस आयकॉन म्हणून ओळखले जाते. त्याचबरोबर तो सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असतो. त्याने शेअर केलेल्या पोस्ट नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. काही दिवसांपुर्वी न्यूड फोटोशूटची पोस्ट वादग्रस्त ठरली होती. यावरुन त्याला ट्रोल केले गेले होते.

मिलिंदने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर गोव्याच्या बिचवर न्यूड धावतानाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. त्याचा हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. नेटकऱ्यांनी या फोटोवर अनेक प्रतिक्रिया दिल्या. काहींनी त्याला यावर ट्रोल केले.

दरम्यान, मिलिंदने त्याला ट्रोल करणाऱ्या ट्रोलर्सला खोचक असं प्रतिउत्तर दिलं आहे. एकाने या फोटोवर ‘हेच ते भाऊ जे नागडे धावले अशी बातमी होती’ अशी प्रतिक्रिया दिली होती. यावर त्याला उत्तर देताना ‘जे नागडे धावतात’ असं म्हणत हसण्याचा इमोजी मिलिंदने वापरला आहे.

मिलिंद सोमण याने स्वतःच्या ५५ व्या वाढदिवशी गोव्याच्या बिचवर न्यूड धावातानाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. यामुळे त्याच्याविरुद्ध आयपीसी कलम २९४ आणि कलम ६७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

महत्वाच्या बातम्या-
गोव्याच्या बिचवर फिटनेस आयकॉन मिलिंद सोमणने घेतली न्युड धाव; गुन्हा दाखल
लोकल फॉर व्होकल! शेणापासून बनवलेल्या पेंटला देशभरात मिळतोय प्रतिसाद
‘अण्णा हजारेंना समर्थन देणं ही माझी चूक होती’, बॉलिवूडच्या प्रसिद्ध दिग्दर्शकाने व्यक्त केली नाराजी 
तुकाराम मुंढेंचा कोरोना काळात भाजपच्या नेत्यांसोबत राडा होऊनही गडकरींनी केले मुंढेंचे कौतुक

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.