VIDEO: सेल्फीसाठी मिलिंद सोमनने महिलेला भररस्त्यात करायला लावले असे काही की, महिला झाली घामाघुम

बॉलिवूडमध्ये असे अनेक सेलिब्रीटी आहेत, ज्यांना भेटण्यासाठी त्यांचे चाहते नेहमीच उत्सुक असतात. त्यातलाच एक कलाकार म्हणजे मिलिंद सोनम. बॉलिवूडमध्ये मिलिंद सोमनला फिटनेस आयकॉन म्हटले जाते.

मिलिंग सोमनलाही भेटण्यासाठी त्याचे चाहते खुप उत्सुक असतात. आता असाच एक चाहता त्याला रस्त्यावर भेटला आहे. मिलिंदने त्या चाहत्याची एक पोस्ट इन्स्टाग्राम अकाऊंवर शेअर केली आहे. ही पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल झाली आहे.

मिलिंद रस्त्यावरुन जात असताना त्याला एक महिला भेटली होती. ती महिला मिलिंदची चाहती असल्यामुळे तिने एक सेल्फी घेण्याची इच्छा व्यक्त केली मात्र सेल्फी घेण्याआधी मिलिंदने तिचा पुशअप्स मारण्यास सांगितले आहे. त्यामुळे ती महिला खुपच घामाघूम झाली आहे.

पुशअप्स मारण्यास सांगितले असता, त्या महिलेने कुठलाही विचार न करता गर्दीमध्ये पुशअप्स मारण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे त्या महिलेने पुशअप्स माराताना साडी घातलेली होती. तिची पुशअप्स पाहून मिलिंद सोमन पण हैराण झाला आहे.

मिलिंद सोमन नेहमीच चाहत्यांना फिट राहण्याचा सल्ला देत असतात, पण त्याच्या चाहत्यांना महिलेने पुशअप्स मारलेले आवडलेले नाही. अनेक लोकांनी असे काम केल्याबद्दल मिलिंदवर टिका केली आहे. तर काही चाहत्यांनी लोकांना फिट ठेवण्यासाठी हा चांगला पर्याय असल्याचे म्हटले आहे.

सेल्फी घेणाऱ्यांसाठी माझा आवडता पुशअप्स. मी रस्त्यावरुन जात होतो, तेव्हा एका महिला माझ्या जवळ आली आणि तिने सेल्फीची मागणी केली. तेव्हा मी तिला १० पुशअप्स मारण्यास सांगितले. तेव्हा तिने साडी घातलीये किंवा आजूबाजूचे लोकं काय म्हणतील याचा विचार केला नाही आणि पुशअप्स मारण्यास सुरुवात केली, असे मिलिंदने त्यांच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले आहे.

महत्वाच्या बातम्या-

मधमाश्यांनी उघडले बाटलीचे झाकण, आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिलेला हा व्हिडीओ तुम्ही पाहिला का?
सुशांतच्या निधनाला एक वर्ष पुर्ण होण्याच्या आधीच रियाने केली ‘ही’ पोस्ट, चाहते म्हणाले..
रणबीर कपूरसाठी कतरिनाने फक्त एक मेसेज करुन सलमान खानसोबत केले ब्रेकअप

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.