Milind Narvekar : गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेनेचा दसरा मेळावा चर्चेत होता. अखेर काल (बुधवार) मुंबई येथे शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटांचा दसरा मेळावा पार पडला. यावर्षी पहिल्यांदाच शिवसेनेचे दोन दसरा मेळावे पार पडले.
शिवसेनेच्या परंपरेनुसार शिवाजी पार्कवर दसरा मेळावा आयोजित करण्यात येत असतो. मात्र, यावर्षी शिवसेनेचे दोन गट पडल्याने दोन्ही गटांकडून शिवाजी पार्कवर आम्हीच दसरा मेळावा घेणार असे सांगण्यात येत होते. परंतु, कोर्टाच्या निर्णयानंतर शिवाजी पार्कवर ठाकरे गटाचा तर बीकेसी मैदानावर शिंदे गटाचा दसरा मेळावा पार पडला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांना सोबत घेऊन शिवसेनेशी बंडखोरी केली. त्यांनतर शिंदे गटाकडून अनेक दावे करण्यात येत होते. यातच दसरा मेळाव्याच्या दिवशी शिवसेनेचे अनेक नेते शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात होते. मात्र, वास्तवात असे काहीच घडले नाही.
शिवसेनेचे सचिव आणि उद्धव ठाकरे यांचे अतिशय निकटवर्तीय मानले जाणारे मिलिंद नार्वेकर हेदेखील शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी हा दावा केला होता. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते.
मात्र,असे काहीच झाले नाही. मिलिंद नार्वेकर हे दसरा मेळाव्याच्या दिवशी उद्धव ठाकरेंच्या स्टेजवर होते. त्यामुळे आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. तसेच दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्याकडून एकमेकांवर जोरदार टीका करण्यात आल्या. त्यामुळे हे दोन्ही मेळावे चांगलेच गाजले.
मिलिंद नार्वेकर यांना उद्धव ठाकरेंची सावली म्हणून संबोधले जाते. शिंदे गटाचे आमदार टीका करताना मिलिंद नार्वेकर यांना बडवे म्हणून संबोधतात. यातच उद्धव ठाकरेंचे अतिशय विश्वासू साथीदार शिंदे गटात जाणार असल्याचे बोलले जात होते. परंतु, या सगळ्या केवळ अफवा असल्याचे दसरा मेळाव्यात सिद्ध झाले आहे.
महत्वाच्या बातम्या
Dasara melava : दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदेंची फजिती; सभा सुरू असतानाच लोकांनी घेतला काढता पाय, नेमकं काय घडलं?
Eknath Shinde : शिंदेंच्या व्यासपीठावर ठाकरेंची सून; एकनाथ शिंदेंचं केलं तोंडभरून कौतूक, राजकीय वर्तुळात चर्चा
Eknath shinde : एकनाथ शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात जागतिक विक्रम?काय घडलं विशेष, वाचा
eknath shinde : एकनाथ शिंदेची खेळी! मेळाव्यासाठी भाजप-मनसे नेत्यांना निमंत्रण नाही, वाचा नेमकं काय प्रकरण?