जाणून घ्या मिलिंद गवळी यांची खरी लव्ह स्टोरी; लग्नासाठी ठेवली होती ‘ही’ अट

सध्या टेलिव्हिजनवर अनेक मालिका प्रसिद्ध आहेत. यातलीच एक मालिका म्हणजे ‘आई कुठे काय करते’. या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. खुप कमी वेळात ही मालिका जास्त प्रसिद्ध झाली.

या मालिकेत काम करणारे कलाकार देखील खुप प्रसिद्ध झाले आहेत. यातलेच एक नाव म्हणजे मालिकेत अनिरुद्धची भुमिका करणारे मिलिंद गवळी. मिलिंद गवळी या मालिकेमुळे घराघरात पोहोचले आहेत.

जाणून घेऊया मिलिंद गवळी यांचा अभिनय क्षेत्रातील प्रवास.

मिलिंद यांचा जन्म १९७४ मध्ये नाशिकमध्ये झाला होता. मिलिंद यांनी त्यांच्या अभिनय क्षेत्रातील प्रवासाला बालकलाकार म्हणून सुरुवात केली. त्यांनी ‘हम बच्चे हिंदुस्थान के’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये प्रवेश केला.

त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले. पण त्यांना हवे तसे यश मिळाले नाही. त्यानंतर काही काळासाठी त्यांनी अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेतला. पण जास्त काळ ते अभिनय क्षेत्रापासून लांब राहू शकले नाही. त्यांनी लवकरच कमबॅक केला.

मालिकेत संजनावर प्रेम करणारे मिलिंद खऱ्या आयुष्यात विवाहित आहेत. त्यांचे लव्ह मॅरेज झाले आहे. मिलिंद एका विवाह समारंभासाठी जळगावला गेले होते. तिथे ते एका मुलीच्या प्रेमात पडले.

या मुलीचे नाव होते दिपा. मिलिंद बघताच क्षणी दिपाच्या प्रेमात पडले. त्यांनी दिपाशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मिलिंदच्या घरच्यांना दिपा पसंत होती. दिपा घरच्यांना देखील हे स्थळ मान्य होते. पण त्यांची या लग्नासाठी एक अट होती.

दिपाच्या घरच्यांनी सांगितले की, ‘आम्हाला हे लग्न मान्य आहे. पण आमची एक अट आहे. मुलगा एखाद्या चांगल्या ठिकाणी नोकरी करणारा हवा. जर त्याला नोकरी नसेल तर त्याने नोकरी शोधावी. मग आम्ही हे लग्न करून देऊ’.

या अटीनंतर मिलिंद यांनी नोकरी शोधायला सुरुवात केली. त्यांनी त्यांचे एमकॉमचे शिक्षण पुर्ण केले. त्यानंतर त्यांनी रेडिओमध्ये नोकरी करायला सुरुवात केली. त्यांना ही नोकरी मिळाल्यानंतर दिपाच्या घरच्यांनी या लग्नाला परवानगी दिली.

लग्नानंतर दोन वर्षे त्यांनी रेडिओमध्ये काम केले. पण त्यांना अभिनय क्षेत्र खुणावत होते. म्हणून त्यांनी परत एकदा अभिनय क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला. त्यांनी मराठी सोबतच अनेक हिंदी मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले.

त्यासोबतच मिलिंद यांनी साऊथ चित्रपटांमध्ये देखील काम केले. त्यांनी ‘निलंबरी’ या मराठी चित्रपटातून अभिनय क्षेत्रात कमबॅक केला. त्यांनी कुछ खोना है कुछ पाना है, सीआयडी, ममता, कहाणी तेरी मेरी, आहट अशा अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केले.

मराठीमध्ये त्यांनी अथांग, गहिरे पाणी, दुहेरी, मुंबई पोलीस, तिसरा डोळा अशा मराठी मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. पण त्यांना सर्वाधिक प्रसिद्धी ‘आई कुठे काय करते’ या मालिकेने मिळाली.

या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. मिलिंदने निभावलेल्या अनिरुद्धच्या भुमिकेने प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान केले. त्यांच्या भुमिकेने मिलिंदला महाराष्ट्रातील घराघरात नेऊन पोहोचवले आहे.

महत्वाच्या बातम्या –

व्हॅलेंटाईन डे स्पेशल: वाचा धकधक गर्ल माधूरी दीक्षित आणि श्रीराम नेनेची लग्नानंतरची हटके लव्ह स्टोरी

…आणि ती त्याला पेट्रोलला पैसे द्यायची; वाचा श्रेयस तळपदेची भन्नाट लव्ह स्टोरी

…म्हणून कपूर कुटुंबाने जेष्ठ अभिनेते राजीव कपूर यांची शोकसभा घेतली नाही

मेंहदी है रचनेवाली! स्वप्नालीच्या हातावर लागली आस्तादच्या नावाची मेंहदी; बघा मेंहदी सोहळ्याचे फोटो

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.